अमृतसर मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटंबनेचा तीव्र निषेध – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

B1न्यूज मराठी नेटवर्क
मुंबई दि.27 – पंजाब मधील अमृसर येथील सुवर्णमंदिर परिसराजवळ उभारण्यात आलेल्या भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या घटनेचा रिपब्लिकन पक्षातर्फे तीव्र निषेध करीत असून या पुतळा विटंबनेची सखोल चौकशी करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अमृतसर मधील पुतळा विटंबनेचा प्रकार अत्यंत दुःखद संतापजनक असून या विटंबनेचा तीव्र निषेध करण्यासाठी पंजाब आणि महाराष्ट्रातही रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून निषेध आंदोलन करावे असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी केले आहे.
अमृतसर मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटंबनेच्या निषेधार्ह घटनेस पंजाब चे मुख्यमंत्री भगवंत मान सरकार जबाबदार आहे.राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखणे; महापुरुषांच्या पुतळ्यांचे रक्षण करणे ही राज्य सरकार ची जबाबदारी आहे.त्यात भगवंत मान अपयशी ठरले आहेत. पुतळा विटंबना करणाऱ्या आरोपीला अटक केली असली तरी या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे.या पुतळा विटंबना प्रकरणा मागे कुणाचा हात आहे कुणाचा कुटील डाव आहे कोण सुत्र्धर आहे हे शोधून काढण्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. पुतळा विटंबना करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी ना. रामदास आठवले यांनी केली आहे .या प्रकरणी अमृतसर मधील पुतळा विटंबना झालेल्या घटनास्थळाला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले येत्या 29 जानेवारी रोजी भेट देणार असल्याचे रिपब्लिकन पक्षाने जाहिर केले आहे.