महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली महिला कर्मचारी मार्फत चालविण्यात येणारा महाराष्ट्रातील एकमेव पेट्रोल पंप : पालकमंत्री जयकुमार गोरे

सोलापूर मनपा निर्मित पेट्रोल पंप हा एक अभिनव प्रकल्प महाराष्ट्रातील एकमवे उदाहरण
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर महानगरपालिका व इंडियन ऑइल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उपक्रम
सोलापूर : महिला आयुक्त यांनी पुढाकार घेऊन महिला कर्मचारी मार्फत चालविण्यात येणारा पेट्रोल पंप आज जो सुरु केला आहे, हा एक आदर्श आहे, शहराच्या विकासा बरोबर महानगरपालिकेचा विकास होण्याकरिता आज जो पेट्रोल पंप सुरू करण्यात आलेला आहे, तो महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण आहे, ज्याचे करावे तेवडे कौतुक कमी आहे अशा शब्दात प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने सोलापूर मनपा निर्मित पेट्रोल पंपाच्या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.
सोलापूर महानगरपालिका व इंडियन ऑइल यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर मनपा मार्फत चालविण्यात येणाऱ्या पेट्रोल पंपाचा शुभारंभ सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आले यावेळी व्यास पिठांवर मनपा आयुक्त शीतल तेली- उगले , शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी आशिर्वाद कुमार, पोलिस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे,मुख्यलेखापाल रत्नराज जवळगीकर,नगर संचालक मनिष भिष्णूरकर,शहर अध्यक्ष नरेंद्र काळे,उपायुक्त आशीष लोकरे, सहा आयुक्त शिशिकांत भोसले,सह. आयुक्त गिरीष पंडित, सह.आयुक्त अनिता मगर,नगर अभियंता सारिका आकूलवार आदि मान्यवर उपस्थित होते.
पारंभी मनपा आयुक्त शीतल तेली-उगले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले यामध्ये त्यांनी पेट्रोल पंप उभारणी बाबत पूर्ण माहिती दिली, यावेळी त्यांनी महानगरपालिका विकासा करिता पेट्रोल पंप उभारणी ही एक सुरुवात असून यापुढे असेच नव नवीन उपक्रम सोलापूर शहरातील नागरिकानकरिता मनपा घेऊन येणार आहे असे सांगितले.