हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून युवासेना बार्शी शहर व तालुक्याच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून युवासेना बार्शी शहर व तालुक्याच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. प्रारंभी शिवाजी कॉलेज परिसरात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन आमदार दिलीपरावजी सोपल, पोलीस उपनिरीक्षक शेटे, उद्योजक नाना वाणी, ज्येष्ठ शिवसैनिक आबा पवार, मंगलताई पाटील, आबा गपाट, राजाभाऊ पाटील, सिनेट सदस्य उषा पवार, शिवसेना शहरप्रमुख दिनेश नाळे, युवतीसेना तालुकाप्रमुख रजनी पाटील, युवासेना उपजिल्हाप्रमुख हेमंत रामगुडे, जिल्हा चिटणीस दिपक तिवाडी, महिला आघाडीच्या कोकिळा जंगले, पिंटू नाईकवाडी, नवनाथ चोबे, अंबऋषी लोकरे, सुरेश मोरे, बापू जाधव,आनंद काशीद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार सोपल यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर तरुणांनी समाजकारण करावे असे सांगितले. शहरप्रमुख हर्षवर्धन पाटील यांनी तालुक्यातील तरुण, विद्यार्थी यांची अडचणी सोडवण्यासाठी युवासेना अग्रेसर राहील अशी ग्वाही दिली तर तालुका समन्वयक पांडुरंग घोलप यांनी बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याची मागणी केली.
५१ रक्तदात्यानी रक्तदान करून बाळासाहेबांना अभिवादन केले. यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजिंक्य बरांगुळे, किरण स्वामी, राहुल बुरसे, अर्जुन सोनावणे, दिपक कसबे, रणजित घुमरे, विजय घोंगडे, सुहास व्हळे, स्वराज क्षिरसागर यांचेसह शहर व तालुक्यातील युवासेना, युवतीसेना, शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. आभार तालुका प्रमुख अजय बादगुडे यांनी मानले.