शास्त्री नगर येथे आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या डांबरी रस्त्याचे कामाचा भूमिपूजन संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रयत्नांतुन महाराष्ट्र शासन सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान योजनेतून जुना प्रभाग १७ शास्त्री नगर भगतसिंग चौक ते २ नंबर बस स्टँड कडे जाणारा रस्ता व परिसरातील रस्त्याच्या कामासाठी ४३, १५, ८११ रुपये निधी मंजूर झाले होते. त्या निधीतून होणाऱ्या रस्त्याचे कामाचा भूमिपूजन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. या रस्ता कामासाठी सोलापूर शहर मध्य विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष, जे बी सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष वाहिद बिजापुरे यांनी पाठपुरावा केला होता.
खासदार प्रणिती शिंदे बोलताना म्हणाले की राजकारणात कधीही जात आणू नये जो आपले काम करतो त्याला मतदान करावे. जातीपातीचा राजकारण करणाऱ्याला त्याची जागा दाखवून द्यावी. मला तीन वेळा मला आमदार म्हणून निवडून आणून आशीर्वाद दिलात आता मी तुमच्यामुळेच खासदार झाले मी तुमच्या सुखदुःखात सदैव साथ देऊन अडचणी सोडविणार आहे. असे खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या.
यावेळी प्रणिती शिंदे यांनी शास्त्री नगर भागात विकासकामासाठी आत्तापर्यंत कोट्यावधी निधी दिला. वाहिद विजापूरे म्हणाले की हा रस्ता अतिशय खराब झाला होता याची माहिती खासदार प्रणितीताई शिंदे यांना दिला असता मी रस्ता करून देण्याचा शब्द दिला होता तो त्यांनी पूर्ण केला.
यावेळी सोलापूर शहर मध्य विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष, जे बी सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष वाहिद बिजापुरे, रमेश कैरमकोंडा, अंबादास कैरमकोंडा, डॉक्टर दासरी, कृष्णा मासन, पीरअहमद कुरेशी, शिवलाल ईराबत्ती, राजु ईगे यांसह यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.