बी. पी. सुलाखे कॉमर्स महाविद्यालयात क्रीडा क्षेत्रातील यशस्वी विद्यार्थिनी क्रांती मोरेचा सन्मान

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : बी. पी. सुलाखे कॉमर्स महाविद्यालयाच्या बी.कॉम. भाग 2 मधील विद्यार्थिनी कुमारी क्रांती ब्रह्मदेव मोरे हिने एअर रायफल क्रीडा प्रकारात उल्लेखनीय कामगिरी करून महाविद्यालयाच्या तसेच बार्शी शहराच्या नावलौकिकात भर घातली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशासाठी महाविद्यालयाच्या वतीने सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

या विशेष कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष नंदन जगदाळे, जनरल सेक्रेटरी प्रकाश पाटील, अरुण देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे तसेच संस्थेचे सर्व सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय करंडे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडाशिक्षक संजय पाटील, ग्रंथपाल यादव मॅडम, IQAC समन्वयक बाळासाहेब लांडे, विभाग प्रमुख किरण चपटे, बाळासाहेब लिंगे, महादेव ढगे, ज्येष्ठ प्राध्यापक भाऊसाहेब सारफळे, क्रीडा शिक्षिका प्राध्यापिका रूपाली शिंदे, व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. दत्तप्रसाद सोनटक्के यांनी क्रांतीचे कौतुक करून तिच्या पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.

या सन्मान सोहळ्यादरम्यान उपस्थित मान्यवरांनी क्रांती मोरे हिच्या चिकाटी, मेहनत आणि कौशल्याबद्दल कौतुक केले. तिने क्रीडा क्षेत्रात मिळवलेले प्राविण्य ही प्रेरणादायी गोष्ट असल्याचे मत व्यक्त केले. महाविद्यालयाने क्रांतीसारख्या विद्यार्थ्यांना सदैव प्रोत्साहन दिले असून भविष्यातील स्पर्धांसाठीही पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले.

या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा क्षेत्राविषयीचा उत्साह आणि प्रेरणा वाढल्याचे वातावरण निर्माण झाले. क्रांती मोरे हिच्या यशामुळे महाविद्यालयाचा गौरव वाढला असून तिच्या पुढील वाटचालीसाठी महाविद्यालयाचे सहकार्य कायम राहणार असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. बी. पी. सुलाखे कॉमर्स महाविद्यालयाने विद्यार्थिनींच्या क्रीडा क्षेत्रातील यशाला सन्मान देऊन सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिल्याचे या सन्मान सोहळ्यामुळे अधोरेखित झाले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या