बार्शीच्या रेश्मा पठाण यांचा उत्कृष्ट महिला अधिकारी म्हणून गौरव

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार्शी पंचायत समिती येथे महिला बाल कल्याण विभागाच्या प्रकल्प अधिकारी या पदावर कार्यरत असलेल्या रेश्मा पठाण यांच्या कार्याची दाखल घेऊन उत्कृष्ट महिला अधिकारी म्हणून गौरव करण्यात आला.
स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ जयंती निमित्त मराठा सेवा संघ शाखा जिल्हा परिषद सोलापूर आयोजित, सावित्री च्या लेकी सन्मान कार्यक्रमात रेश्मा पठाण यांचा उत्कृष्ट महिला अधिकारी म्हणुन तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी व विद्यमान जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर, दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. त्यांच्या या सन्मानाबद्दल बार्शी तालुक्यातील विविध क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.