कामगारांची फसवणूक टाळण्यासाठी कामगार कल्याणकारी मंडळाचा निर्णय , आता कामगारांची ऑनलाईन नोंदणी होणार कार्यालयातच

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

धाराशिव : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाअंतर्गत बांधकाम कामगारांची नोंदणी,नूतनीकरण व त्यांना विविध कल्याणकारी योजनांचे लाभ वाटपाचे कामकाज करण्यात येते.बांधकाम कामगार नोंदणीची प्रक्रिया फक्त एक रूपयात होते.

तरीही ऑनलाईन नोंदणीच्या नावाखाली एजेंट बांधकाम कामगारांची फसवणूक करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत.या फसवणूक प्रकरणाला आळा बसावा यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने ऑनलाईन नोंदणीचे सर्व अधिकार स्वतःकडे घेतले आहेत.त्यामुळे फसवणूक प्रकाराला आळा बसणार असून बांधकाम कामगारांची नोंदणी आता कार्यालयातच होणार आहे.

राज्यातील बांधकाम कामगारांसाठी तालुका कामगार सुविधा केंद्र आहेत. या केंद्रामध्ये नवीन नोंदणी किंवा नोंदणी नूतनीकरण करण्यासाठी अर्ज सादर करता येतात. यासाठी संबंधित कामगारांना मूळ कागदपत्रासोबत तालुका कामगार सुविधा केंद्रात उपस्थित राहावे लागते.प्रत्येक तालुक्याला एक याप्रमाणे जिल्हयात ०८ तालुका कामगार सुविधा केंद्र सुरु करण्यात आले आहेत. यामुळे कामगाराला तालुक्याच्या ठिकाणी कार्यालयात स्वतः जाऊन नोंदणी,नुतनीकरण व लाभाचे अर्ज सादर करावे लागणार आहे.या सुविधेमुळे फसवणुकीच्या प्रकरणाला आळा बसणार आहे.

तालुका कामगार सुविधा केंद्र येथे कामगारांची नोंदणी,नुतनीकरण व लाभाचे अर्ज स्वीकारले जाणार आहे.तालुका कार्यालयात आवश्यक ती कागदपत्रे सादर केल्यावर संबंधित कामगाराच्या अंगठ्याचे ठसे व प्रत्यक्ष फोटो घेऊन तो कामगार पात्र ठरला की अपात्र हे त्याच ठिकाणी सांगितले जाणार आहे.सर्व नोंदणी प्रकिया मोफत आहे.एजंट व त्रयस्थ व्यक्ती यांच्या आमिषाला अथवा भुलथापांना बळी न पडता थेट कामगारांनी तालुका कार्यालयात जाऊन अवघ्या एक रूपया नोंदणी फी भरून नोंदणी करावी.एजंटने पैशाची मागणी केल्यास त्यांच्या विरोधात जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी. असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी सुधाकर कोनाळे यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या