गोपाळपूर येथे श्री सत्य साई सेवा संस्था महाराष्ट्र व एम एम आर यांच्या वतीने येथील ग्रामस्थांना साई रोग प्रतिकार शक्ती किटसचे वाटप

B1न्यूज मराठी नेटवर्क / दिनेश खंडेलवाल
पंढरपूर : तालुक्यातील गोपाळपूर येथे श्री सत्य साई सेवा संस्था महाराष्ट्र व एम एम आर यांच्या वतीने येथील ग्रामस्थांना साई रोग प्रतिकार शक्ती किटसचे वाटप करण्यात आले. कोरोना चा प्रसार वाढत असून त्यासाठी ग्रामस्थांना सत्य साई सेवा संस्था च्या वतीने आरोग्य किटस देण्यात आल्या यामध्ये वाफ घेण्याचे मशीन, प्रोटीन पावडर, ओ आर एस पावडर, विटामिन सी व झिंक चा दोन महिन्याच्या गोळ्या, जंतुनाशक साबण दोन नग, वेदनाशामक मलम, होमिओपॅथीच्या गोळ्या, मास्क चार नग असे आरोग्यं कीट चे स्वरूप होते. एकूण 20 किट वाटप ग्रामस्थांना करण्यात आले. श्री सत्यसाई संस्था ही नेहमीच गोरगरिबांना व गरजवंतांना मदत करत असते. यावेळी सत्य साई सेवा संघटनाचे पंढरपूर सेंटरचे प्रमुख संपतराव वाघाटे, प्रशांत जाधव, विराज पाटील, राहुल चव्हाण, प्रवीण जाधव उपस्थित होते.