सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने संविधान दिनानिमित्त अभिवादन आणि संविधान प्रास्ताविक वाचन कार्यक्रम संपन्न
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने, भारताच्या राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रम घेऊन देशाची राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला अर्पण केली या निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन भाऊ नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करून संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.
यावेळी महिला अध्यक्ष प्रमिलाताई तूपलवंडे, प्रदेश सरचिटणीस संजय हेमगड्डी, माजी महापौर सुशीला आबुटे, एन के क्षीरसागर, सुरेश पाटोळे, राजन कामत, पशुपती माशाळ, लखन गायकवाड, अनिल मस्के तिरुपती परकीपंडला, सुमन जाधव, सागर उबाळे, विवेक कन्ना, संजय गायकवाड, शिवाजी साळुंखे, मयूर खरात, शोभा बोबे, सुभाष वाघमारे वशिष्ठ सोनकांबळे, गिरीधर थोरात, सायमन गट्टू, संघमित्रा चौधरी, नुर अहमद नालवार, वर्षा अतणुरे, मोहसीन फुलारी, अभिलाष अच्युगटला, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.