जिल्ह्यात आचारसंहिता कालावधीत 31 कोटी 77 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

पुणे : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान 15 ऑक्टोबरपासून जिल्ह्यात 31 कोटी 77 लाख 3 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे. यात 10 कोटी 92 लाख 25 हजार रुपये रोकड, 5 कोटी 2 लाख 57 हजार रुपयांचे 6 लाख 5 हजार लिटर मद्य, 58 लाख 81 हजार रुपये किंमतीचे अंमली पदार्थ, 8 कोटी 63 लाख 53 हजार रुपयांचे मौल्यवान धातू, 6 कोटी 59 लाख 88 हजारांच्या वस्तूंचा समावेश आहे.

जिल्ह्यात सर्व विधानसभा मतदार संघात भरारी पथके (एफएसटी), स्थिर सर्वेक्षण पथके (एसएसटी) कार्यान्वित असून संशयास्पद वाहने, वाहतूक आदीवर काटेकोर लक्ष ठेऊन कार्यवाही केली जात आहे. पोलीस, आयकर विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, केंद्रीय वस्तू व सेवा कर विभाग आदी विभागांच्यावतीनेही यामध्ये कार्यवाही केली जात आहे.

विधानसभा मतदार संघ निहाय आतापर्यंतची जप्तीची कारवाई

जिल्ह्यात सर्वाधिक 6 कोटी 70 लाख 34 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पर्वती विधानसभा मतदार संघात जप्त करण्यात आला आहे. यात 2 लाख 88 हजार रुपयांचे 727 लिटर मद्य, 6 कोटी 60 लाख रुपयांचे मौल्यवान धातू, 7 लाख 46 हजार रुपयांच्या वस्तू यांचा समावेश आहे. आंबेगाव मतदार संघात सर्वात कमी किंमतीचा अर्थात 1 लाख 17 हजार रुपये रोकड, 3 लाख 91 हजार रुपयांचे 5 हजार 558 लिटर मद्य, 85 हजार रुपयांच्या वस्तू असा एकूण 5 लाख 93 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

बारामती मतदार संघात 6 लाख 83 हजार रुपयांचे 12 हजार 16 लिटर मद्य, 2 लाख 3 हजार किंमतीच्या वस्तू असा 8 लाख 87 हजारांचा मुद्देमाल, भोर- 60 लाख रुपयांचे 25 हजार 487 लिटर मद्य, 81 हजार रुपयांचे अंमली पदार्थ, 1 कोटी 35 लाख 29 हजार रुपयांच्या वस्तू असा एकूण 1 कोटी 96 लाख 47 हजार रुपयांचा, भोसरी- 23 लाख 26 हजार रुपये रोकड, 21 लाख 45 हजार रुपयांचे 8 हजार 778 लिटर मद्य, 2 लाख 84 हजारांचे अंमली पदार्थ, 21 लाख 32 हजार रुपयांच्या वस्तू असा 68 लाख 86 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

चिंचवड- 40 लाख 11 हजार रुपये रोकड, 22 लाख 91 हजार रुपयांचे 9 हजार 569 लिटर मद्य, 63 हजार रुपयांचे अंमली पदार्थ, 5 लाख 45 हजारांच्या वस्तू असा 69 लाख 10 हजारांचा मुद्देमाल, दौंड- 13 लाख 99 हजार रुपये रोकड, 44 लाख 84 हजार रुपयांचे 86 हजार 428 लिटर मद्य, 12 हजार रुपयांचे अंमली पदार्थ, 1 लाख 72 हजार रुपयांच्या वस्तू असा 60 लाख 67 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हडपसर- 35 लाख 90 हजार रुपये रोकड, 10 लाख 52 हजार रुपयांचे 7 हजार 88 लिटर मद्य, 3 कोटी 18 लाख 61 हजार रुपयांच्या वस्तू असा 3 कोटी 65 लाख 3 हजारांचा मुद्देमाल, इंदापूर- 5 लाख 25 हजार रुपये रोकड, 19 लाख 3 हजार रुपयांचे 17 हजार 14 लिटर मद्य, 10 लाख 98 हजार रुपयांच्या वस्तू असा 35 लाख 26 हजारांचा मुद्देमाल, जुन्नर- 28 लाख 78 हजार रुपयांचे 13 हजार 950 लिटर मद्य, 5 लाख 93 हजार रुपयांचे अंमली पदार्थ, 61 लाख 27 हजार रुपयांच्या वस्तू असा 95 लाख 99 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कसबापेठ मतदार संघात 2 लाख 9 हजार रुपयांचे 1 हजार 106 लिटर मद्य, 17 हजार रुपयांचे अंमली पदार्थ, 5 लाख 34 हजार रुपयांच्या वस्तू असा 7 लाख 60 हजारांचा मुद्देमाल, खडकवासला- 5 कोटी रुपये रोकड, 14 लाख 5 हजार रुपयांचे 6 हजार 15 लिटर मद्य, 16 लाख 60 हजार रुपयांचे अंमली पदार्थ, 18 लाख 42 हजार रुपयांच्या वस्तू असा 5 कोटी 49 लाख 7 हजारांचा मुद्देमाल, खेड आळंदी- 89 लाख 8 हजार रुपये रोकड, 36 लाख 64 हजार रुपयांचे 44 हजार 685 लिटर मद्य, 10 लाख 79 हजार रुपयांचे अंमली पदार्थ, 14 लाख 16 हजार रुपयांच्या वस्तू असा 1 कोटी 50 लाख 68 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कोथरुडमध्ये 6 लाख 26 हजार रुपयांचे 1 हजार 773 लिटर मद्य, 2 लाख 48 हजार रुपयांचे अंमली पदार्थ, 1 लाख 71 हजार रुपयांच्या वस्तू असा 10 लाख 46 हजारांचा मुद्देमाल, मावळ- 27 लाख 12 हजार रुपये रोकड, 81 लाख 84 हजार रुपयांचे 1 लाख 62 हजार 840 लिटर मद्य, 2 लाख 62 हजार रुपयांचे अंमली पदार्थ, 98 लाख 97 हजारांचे मौल्यवान धातू, 27 लाख 92 हजार रुपयांच्या वस्तू असा 2 कोटी 38 लाख 47 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पिंपरी- 4 लाख 48 हजार रुपये रोकड, 6 लाख 61 हजार रुपयांचे 6 हजार 970 लिटर मद्य, 5 लाख 34 हजार रुपयांच्या वस्तू असा 16 लाख 43 हजारांचा मुद्देमाल, पुणे कॅन्टोन्मेंट- 3 लाख 20 हजार रुपयांचे 1 हजार 795 लिटर मद्य, 12 लाख 45 हजार रुपयांचे अंमली पदार्थ, 5 लाख 89 हजार रुपयांच्या वस्तू असा 21 लाख 54 हजारांचा मुद्देमाल, पुरंदर- 58 लाख 87 हजार रुपयांचे 89 हजार 972 लिटर मद्य, 29 हजार रुपयांचे अंमली पदार्थ, 2 लाख 50 हजार रुपयांच्या वस्तू असा 61 लाख 67 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शिरुरमध्ये 3 कोटी 1 लाख 90 हजार रुपये रोकड, 52 लाख 60 हजार रुपयांचे 92 हजार 312 लिटर मद्य, 12 हजार रुपयांचे अंमली पदार्थ, 1 कोटी 4 लाख 56 हजारांचे मौल्यवान धातू, 5 लाख 11 हजार रुपयांच्या वस्तू असा 4 कोटी 64 लाख 28 हजारांचा मुद्देमाल, शिवाजीनगर- 8 लाख 83 हजार रुपयांचे 5 हजार 405 लिटर मद्य, 2 लाख 89 हजार रुपयांचे अंमली पदार्थ, 3 लाख 81 हजार रुपयांच्या वस्तू असा 15 लाख 53 हजारांचा मुद्देमाल, वडगाव शेरी- 50 लाख रुपये रोकड, 10 लाख 2 हजार रुपयांचे 5 हजार 547 लिटर मद्य, 6 हजार रुपयांचे अंमली पदार्थ, 4 लाख 67 हजार रुपयांच्या वस्तू असा 64 लाख 76 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या