सेकंडरी स्कूल्स एम्प्लॉईज को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. मुंबई यांच्या सोलापूर शाखेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : सेकंडरी स्कूल्स एम्प्लॉईज को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. मुंबई यांच्या सोलापूर शाखेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन व सभासद सहकार प्रशिक्षण व पाल्य गुणगौरव सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार सुभाष ( बापू ) देशमुख माजी सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य व आमदार दत्तात्रय सावंत पुणे विभाग शिक्षक मतदार संघ हे होते.

सेकंडरी स्कूल्स एम्प्लॉईज को-ऑप क्रेडिट सोसायटी लि. मुंबई संचलित सोलापूर शाखेच्या नूतन इमारत व विश्रामगृहाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संपन्न झाले. संस्थेने उभारलेल्या या विश्रामगृहाचा राज्यभरातून तुळजापूर, पंढरपूर, सोलापूर या तीर्थक्षेत्री येणार्‍या सभासदांना फायदा होणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत बाजीराव पाटील तसेच सचिव किशोर मुरलीधर पाटील, सहसचिव सतीश ज्ञानदेव माने, खजिनदार सतेश शहाजी शिंदे, संचालक पांडुरंग ज्ञानदेव कणसे, भाऊसाहेब रामभाऊ आहेर, जगन्नाथ तुकाराम जाधव गोविंद आबाजी सूळ व पालक संचालक प्रमोद ( पप्पू ) देशमुख तसेच चेअरमन बाळे पतसंस्था समाधान घाडगे, सुभाष भीमणवरु, गुरुनाथ वांगीकर अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती, संपर्कप्रमुख शंकर वडने, बापू दळवी, सारंग पाटील, राजशेखर चौधरी मुख्याध्यापक बिराजदार, चणबसप्पा बिराजदार, राजकुमार कस्तुरे, मस्के सर, डुरे सर, सरदार नदाफ सर, तोडकरी सर, शिवानंद तेगनगीरी सर, मुख्याध्यापक मोहम्मद शेख, पवन सुतार सर, भोईटे सर, अशोक बगले सर, मुख्याध्यापक सुरेश नेल्लूरे सर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

या कार्यक्रमाची प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन चंद्रकांत पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन दत्तात्रय मोकाशी सर व सत्यवान माळी यांनी केले व सहसचिव सतीश माने सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या