तुळजापूर येथे साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी
B1न्यूज मराठी नेटवर्क
तुळजापूर : साहित्यरत्न लोकशाहीर डॉ .अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आले. तुळजापूर सकल मातंग समाजाच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री अशोक [महाराज] नागटिळक हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री अशोक [महाराज] नागटिळक यांच्या शुभहस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसेवक किशोर साठे, माऊली भोसले, भाजपा सरचिटणीस सागर पारडे, राकेश भांजी, पप्पुमेंबर शिंदे, महेश खंदारे, अभिषेक पवार, मंगेश हजारे, महेश लोंढे , इतर मान्यवर उपस्थित होते.