महेदवी समाजाचा रोजा इफ्तार कार्यक्रम संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : माजी मंत्री दिलीप सोपल व खासदार ओमराजे निंबाळकर आणि माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शहरातील महेदवी मशीद येथे महेदवी समाजाचा रोजा इफ्तार कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक महेदीमिया लांडगे यांनी केले होते.
यावेळी सामुहिकरित्या रोजा सोडल्यांनतर नमाज पठण झाले. यावेळी प्रास्ताविकामध्ये लांडगे यांनी सोपल यांचे मुस्लिम समाजाशी अतुट नाते असून बार्शी तालुक्यातील मुस्लीम समाजाच्या तिन पिढ्यातील कुटूंबांची सोपल यांच्या बरोबर जवळीक आहे. त्यामुळे सोपल यांच्या रमजान ईद व सर्वच धार्मिक कार्यक्रमातील उपस्थितीमुळे समाज बांधवांचा आनंद वाढतो असे सांगितले. यावेळी सोपल यांनी मनोगतामध्ये आपण मुस्लीम समाजाच्या सार्वजनिक समस्या सोडविण्यासाठी कायम वचनबध्द असल्याचे सांगितले.
यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर व माजी नगराध्यक्ष विश्वास बारबोले यांनी या उपक्रमाबद्दल संयोजकांचे कौतुक केले. यावेळी ऍड. प्रशांत शेटे, मनीष चाव्हान,माजी नगरसेवक वाहीद शेख, दिनेश नाळे, पाशाभाई शेख, कोहिनूर सय्यद, असिफ जमादार,वैभव पाटील, निलेश मुद्दे, अतिश बिसेन, बाबा कुरेशी, बडूभाई लांडगे आदी उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार समाजातर्फे शहेजादे मौलवीसाहब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.