स्तनाच्या कर्करोगावर जिल्हा परिषदेचे पुढचे पाऊलस्तनाचा कर्करोग जनजागृती मोहिमेचा शुभारंभ

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग व निरामय हॉस्पिटल यांच्या संयुक्त प्रयत्नातून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये स्तनाचा कर्करोग जनजागृती राबवण्यात येणार आहे.सदरची मोहीम जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांची संकल्पना व मार्गदर्शनातून करण्यात येत आहे.या मोहिमेमध्ये जिल्ह्यातील 25 वर्षांवरील एकूण 7 लाख महिलांची तपासणी करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे.

स्तनाचा कर्करोग जनजागृती मोहिम अंतर्गत आज दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कंदलगाव येथे या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.याप्रसंगी दक्षिण सोलापूरचे आ.सुभाष देशमुख, कंदलगावचे सरपंच शारदा कडते, उपसरपंच चाँद बादशाह सय्यद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( ग्रामपंचायत ) इशाधिन शेळकंदे, डॉ.फहिम गोलेवाले , जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ.अनिरुद्ध पिंपळे, दक्षिण सोलापूरचे गट विकास अधिकारी बाळासाहेब वाघ , तालुका आरोग्य अधिकारी डॉ.निलम घोगरे , वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.स्तनाचा कर्करोग जनजागृती मोहिमेअंतर्गत निरामय संस्थेच्या प्रगतिशील ए आय तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे.दरम्यान या मोहिमेअंतर्गत महिलांची थर्मल स्क्रीनिंग करणे ,सोनोग्राफी व मॅमोग्राफ उपकरणे पुरवणे, जनजागृती करणे, उपचाराकरीता पाठपुरावा करणे , तज्ञांचा सल्ला घेणे ,उपचारास जिल्हा परिषद निधी मधून 20 हजार पर्यंत सहाय्य करणे या गोष्टींचा समावेश आहे.

आज महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग याबाबत जनजागृती करणे तसेच महिलांनीही सदर आजाराविषयी न घाबरता पुढे येऊन तपासणी करून घ्यावी आणि या तपासणीसाठी पुरुषांनीही आजाराचे गांभीर्य लक्षात घेऊन सहकार्य करणे आवश्यक आहे.या मोहिमेला प्रोजेक्ट निदान हे नाव देण्यात आले आहे कारण कर्करोग सारख्या आजारात लवकर निदान हाच सर्वात मोठा उपचार असतो म्हणूनच यासाठी स्वतंत्र ॲम्बुलन्स ची व्यवस्था करण्यात आली आहे.असे मत मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी व्यक्त केले.

दक्षिण सोलापूर हा तालुका कर्नाटक राज्याच्या सीमेवर असल्याने येथील आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा परिषदेने लक्ष घालून शासनाचा जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन दक्षिण सोलापूर तालुक्याचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्नशिल रहावे अशी अपेक्षा आहे. असे आ. सुभाष देशमुख म्हणाले. जिल्हा परिषद अंतर्गत स्तनाचा कर्करोग जनजागृती मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी आ.सुभाष देशमुख , मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे , सरपंच शारदा कडते , उपसरपंच चाँदबादशहा सय्यद , डॉ. फयिन गोलेवाले , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) इशाधीन शेळकंदे , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले आदी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या