बार्शीत मुस्लिम बिरादरी जमात संस्थेचे वतीने 2024 चे दिनदर्शिका चे प्रकाशन

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार्शी शहरातील मुस्लिम समाजातील शेख, सय्यद, पठाण, काजी, पटेल, मुलाणी, बिरादरी जमात चे नागरिकांनी एकत्र येऊन कुटुंबातील मुला-मुली चे शिक्षण सोयरीकी साठी बिरादरी जमात चे माध्यमातून एकत्र येऊन दि 12 डिसे 2023 रोजी जमात संस्थेचे संस्थापना केली असल्याचे माहिती बिरादरी जमातचे अध्यक्ष आयुबभाई शेख यांनी दिली.या जमात चे माध्यमातून बार्शी शहर व तालुक्यातील कुटुंबातील सर्व बिरादरी जमात कार्यात सहभागी व्हावे.
मुस्लिम बिरादरी जमात संस्थेचे माध्यमातून 2024 चे दिनदर्शिकेचे प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्ष हाजी इकबाल पटेल, रमजान भाई पठाण , डॉ मौला शेख, सिकंदर भाई शेख(प्रसिद्ध व्यापारी) , सलीम भाई पठाण , उस्मान अलीशहा साहेब,बशीर भाई काजी , मकसूद भाई मुल्ला, समशेर भाई पठाण,(मा. नगर अभियंता बार्शी), इंजिनीयर मलिक मुल्ला, दादा मिस्त्री या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी मुस्लिम बिरादरी जमात संस्थेचे कार्यकारणी सदस्य सादिक भाई काजी यांनी सूत्रसंचालन केले व प्रास्ताविक मा. नगरसेवक वाहेद पाशा शेख यांनी केले .अध्यक्ष आयुबभाई शेख ,उप अध्यक्ष रफिक गुलाम दस्तगीर सातारकर ,सचिव झाकीर हुसेन युसुफ शेख ,सहसचिव अख्तर इननुस शेख, खजिनदार वसीम रमजान पठाण, तसेच संस्थेचे कार्यकारी सदस्य सादिक कादर मुल्ला, सलीम खाजा शेख ,अल्ताफ बादशाह सय्यद ,वाहीद हारुण शेख, फिरोज महमूद शेख, आशपाक जहांगीर मुलानी एजाज कदीर शेख ,शकील उस्मान मुलानी ,सादिक बशीर काजी , शहानवाज मकसुद मुल्ला, इब्राहिम अकबर काजी, नयुम अब्दुल हमीद शेख ,आझम बाबूलाल शेख , सगीर रहीम सय्यद, मुसा गुलाब मुलाणी, अकीब आयुब पठाण ,इरफान सत्तार शेख, साजन शब्बीर शेख, इस्माईल उस्मान पटेल,ई कार्यकारीणी चे सदस्य व इतर बिरादरी चे सदस्य उपस्थित होते. यावेळी बिरादरी जमात चे इरफान सत्तार शेख यांनी आभारप्रदर्शन केले.व पुढील काळात बिरादरी जमात संस्थेचे कार्य महाराष्ट्रात करण्यात येणार असल्याचे माहीती अध्यक्ष आयुबभाई शेख यांनी सांगितली.