यावली येथे कॅण्डल मार्च आणि लक्षणिक उपोषण व नेत्यांना गावबंदी

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : तालुक्यातील यावली येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनास पाठिंबा देत दिनांक 31ऑक्टोबर 23 रोजी संध्याकाळी 8 वाजता कॅण्डल मार्च संपूर्ण गावातून घेण्यात आला या कॅण्डल मार्च ला गावातील सर्व जातीधर्माचे लोक उपस्थित होते. तसेच दिनांक 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 ते 5 पर्यंत लाक्षणिक उपोषण करण्यात आले. उपोषणात 5 वर्षांपासून ते 60 वर्ष वयापर्यंत चे लहान थोर सहभागी झाले तर गावाच्या प्रवेशद्वार आणि ग्रामपंचायत समोर सर्व नेत्यांच्या प्रवेश बंदीचे बोर्ड हि लावन्यात आले.
लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अन्यथा मुंडन आंदोलन व सरकारचे श्राद्ध घालण्यात येईल असे सकल मराठा समाज यावली चा वतीने सांगण्यात आले.