बार्शी तहसील कार्यालयात शासन आपल्यादारी अभियानाचा शुभारंभ आमदार राजेंद्र राऊत यांच्या शुभहस्ते संपन्न

0

नागरिकांनी शासकीय कार्यालयांमध्ये फेऱ्या मारण्याऐवजी शासकीय यंत्रणेनं लोकांपर्यंत पोहचून लोकांना लाभ मिळवून द्यावा : आमदार राजेंद्र राऊत

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : तहसील कार्यालय येथे शासन आपल्या दारी अभियाना अंतर्गत आमदार राजाभाऊ राऊत यांच्या शुभहस्ते तहसिल कार्यालय, पंचायत समिती,आरोग्य विभाग, महावितरण, नगरपालिका, कृषी विभाग यांच्यावतीने प्रातिनिधिक स्वरूपात काही लाभार्थी यांना लाभांचे वाटप करण्यात आले. विविध योजनांच्या लाभांसाठी नागरिकांनी शासकीय कार्यालयांमध्ये फेऱ्या मारण्याऐवजी शासकीय यंत्रणेनं लोकांपर्यंत पोहचून लोकांना लाभ मिळवून द्यावेत असे आमदार राजाभाऊ राऊत यांनी सांगितले.

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सरकारने अनेक लोककल्याणकारी योजना सुरू केल्या असुन त्या सर्व योजनांचा लाभ थेट शेवटच्या लाभार्थ्यापर्यंत मिळावा यासाठी आपण कायम प्रयत्नशील असून अधिकाधिक लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे,केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नागरिकांना याचा लाभ देण्यात येत आहे,राज्य सरकारने महिलांना एसटी बस प्रवास भाड्यात ५०% सवलत देण्यात आल्यामुळे कोट्यावधी महिलांनी प्रवास केला आहे यावरून राज्य सरकार सर्वसामान्य जनतेचे असल्याचे सिद्ध झाले आहे,सर्व योजनांचा सर्वसामान्य नागरिकांना त्यांचा लाभ देण्यासाठी शासन आपल्या दारी आले आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्य शासनाच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तहसील कार्यालय बार्शी येथे आयोजित करण्यात आलेल्या या शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या माध्यमातून थेट लाभार्थ्यांना लाभ देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचे आमदार राजाभाऊ राऊत यांनी सांगितले.

यावेळी प्रांत अधिकारी विठ्ठल उदमले, प्रभारी तहसीलदार अंजली मरोड, तहसीलदार श्रीकांत कांबळे, निवासी नायब तहसीलदार संजीवन मुंढे, काझी साहेब, गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले, कृषी अधिकारी शहाजी कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य मदन दराडे, सहाय्यक अभियंता सदानंद रणझुंजारे, कनिष्ठ अभियंता सतीश पाटील, मंडळ अधिकारी विशाल नलवडे, एकात्मिक बालविकास अधिकारी रेश्मा पठाण, विस्तार अधिकारी शैलेश सदाफुले, निवडणूक शाखा कर्मचारी आकाश गुळवे, अविनाश ठोंबरे, उदय कोंढारे तसेच सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी, लाभार्थी नागरिक उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या