भारतीय जनता पार्टीतर्फे सावरकर गौरव यात्रा उत्साहात : राहुल गांधींचा केला निषेध

B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : हिंदूसंघटक स्वातंत्र्यवीर सावरकरजी का अपमान नहीं सहेगा हिंदुस्थान, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो, राहुल गांधींचा निषेध असो, भारतमाता की जय अशा घोषणा देत भारतीय जनता पार्टी शहर मध्यतर्फे रविवारी सावरकर गौरव यात्रा मोठ्या उत्साहात काढण्यात आली. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा निषेध करण्यात आला.
प्रारंभी रंगभवन येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज उद्यानातील छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर सावरकर गौरव यात्रेस प्रारंभ झाला. अग्रभागी स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव रथ होता. यामागे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते भगवे झेंडे भाजपचे झेंडे घेऊन सहभागी झाले होते. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मुखवटे परिधान केले होते.
सावरकर गौरव यात्रेत सहभागी झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी गळ्यात भगवे उपरणे, डोक्यावर भगव्या टोप्या परिधान केल्या होत्या
या ठिकाणी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी जेष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांनी मार्गदर्शन केले. श्री. जोशी म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यासाठी नागरिकांनी हाल अपेक्षा भोगल्या. स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी करणाऱ्यांना सावरकर कळालेलेच नाहीत. देशातील संरक्षण सिद्धता, विकास अशा अनेक मुद्द्यावर सावरकरांनी भारत सरकारला मार्गदर्शन केले होते. त्यांनी बलशाली भारताचे स्वप्न पाहिले. सावरकरांच्या बदनामीमागे हिंदू धर्माचा अपमान करण्याचा हेतू आहे. सावरकरांचे अखंड भारताचे स्वप्न आपण पूर्ण केले पाहिजे, असेही श्री. जोशी यावेळी म्हणाले.
याप्रसंगी खा. डॉ. जय सिद्धेश्वर महास्वामी, माजी सहकारमंत्री आ. सुभाष देशमुख, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख, शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, भाजपचे संघटन सरचिटणीस रुद्रेश बोरामणी, सरचिटणीस शशी थोरात, माजी आमदार नरसिंग मेंगजी, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, माजी सभागृह नेते शिवानंद पाटील, रामचंद्र जन्नू, माजी नगरसेवक नागेश वल्याळ, व्यापारी आघाडीचे शहराध्यक्ष जयंत होले पाटील, महिला आघाडीच्या शहरप्रमुख इंदिरा कुडक्याल, प्रशांत बडवे, चन्नवीर चित्ते, अनिल कंदलगी, जय साळुंखे, प्रशांत फत्तेपुरकर, यादगिरी बोम्मा, भटके विमुक्त आघाडीचे माजी नगरसेवक संतोष भोसले, भाजयुमोचे शहर अध्यक्ष गणेश साखरे, युवक प्रदेशाध्यक्ष अमोल गायकवाड, दत्तात्रय पोसा, नागेश पासकंटी, अविनाश बोमड्याल, राजेश अनगिरे, पुरूषोत्तम उडता, डॉ. राजेंद्रप्रसाद गाजुल, अंबादास माढेकर, श्रीनिवास दायमा, भूपती कमटम, अर्चना वडनाल, विमल कन्ना, शिवकुमार कामाठी यांची प्रमुख उपस्थिती होती.