शिवाजीराव कर्डिले अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी

B1न्यूज मराठी नेटवर्क
अहमदनगर : जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी आमदार शिवाजीराव कर्डिले निवडून आले आहेत. जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी भाजपचे शिवाजीराव कर्डिले आणि महाविकास आघाडीचे चंद्रशेखर घुले यांच्यात लढत झाली. शिवाजीराव कर्डिले यांनी एक मतांनी विजय झाला.शिवाजीराव कर्डिले यांच्या विजयामागे पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि खासदार सुजय विखे यांनी महत्वाची भूमिका बजावली. शिवाजीराव कर्डिले यांच्या विजयाबरोबरच काँग्रेस नेते तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे वर्चस्व असलेली जिल्हा सहकारी बँक आता विखेंच्याच म्हणजेच भाजपच्या ताब्यात गेली आहे.अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी शेवटच्या क्षणी भाजपतर्फे शिवाजीराव कर्डिले यांचा अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यामुळे निवडणुकीत चुरस वाढली. निवडणूक अटीतटीची होणार, असे चित्र निर्माण झाले. कर्डिले यांच्यासह विखे पिता-पुत्रांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. आणि विजयाचे गणित जुळवून आणले. अहमदनगर जिल्हा सहकारी बँक अध्यक्षपदाची निवड मतदानाद्वारे झाली. या निवडणुकीत शिवाजीराव कर्डिले यांना दहा मते मिळाली. चंद्रशेखर घुले यांना नऊ मते मिळाली. एक मत बाद झाले.