सुश्रुत हॉस्पिटल मध्ये घेतला १०२ रुग्णांनी मोफत आरोग्य तपासणी व उपचाराचा लाभ

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सुश्रुत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बार्शी व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांच्या संयुक्त विद्यमानाने आज घेण्यात आलेल्या महा रक्तदान शिबिरामध्ये एकूण 30 हॉस्पिटल स्टाफने रक्तदान केले. मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये एकूण १०२ रुग्णांना मोफत तपासणी व उपचाराचा लाभ मिळाला. रूग्णाची तपासणी डाॅ.संजय अंधारे यांनी केली. यामध्ये हृदयरोग, डायबिटीस, किडनीचे आजार, लकवा/पॅरालिसिस व फुफुसासंबंधीतील आजाराने ग्रस्त रुग्णांची तपासणी व मोफत उपचार करण्यात आले.या शिबिरामध्ये इसीजी, टू डी इको, चेस्ट एक्स-रे करण्यात आले. तसेच रक्त तपासणी मध्ये सीबीसी,यूरिक ॲसिड व रक्तातील साखरेची तपासणी मोफत करण्यात आली.रुग्णांची पल्मोनरी फंक्शन टेस्ट (PFT) व डायबिटीस फूट एक्झामिनेशन मोफत करण्यात आली.
तसेच ५ मधुमेह ग्रस्त रुग्णांना मोफत Continuous Glucose Monitoring (CGM)device बसवण्यात आले.