पत्रकारांनी शहर व तालुक्याच्या विकासाचे प्रश्न मांडले पाहिजे व ते सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन : आमदार राजेंद्र राऊत

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी शहरातील पत्रकारांसाठी लवकरात लवकर शहराच्या मध्यवर्ती भागात आमदार निधीतून सुमारे 25 लाख रूपये खर्चून अद्ययावत पत्रकार भवन बांधून देण्याची घोषणा यावेळी आमदार राऊत यांनी केली.

बार्शी. ता 6 : बार्शी शहराला पत्रकारितेचा समृध्द वारसा लाभला असून पत्रकारांनी आता काळानुरूप बदलले पाहिजे आपल्या लेखनीतून पत्रकारांनी शहर व तालुक्याच्या विकासाचे प्रश्न मांडले पाहिजे व ते सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन आमदार राजेंद्र राऊत यांनी केले. येथील श्रीमान रामभाई शाह रक्तपेढीच्या सभागृहात शुक्रवारी (ता.6) सकाळी बार्शी प्रेस क्लबच्या वतीने दर्पणकार  आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंती निमित्त मराठी पत्रकार दिनानिमित्त समारंभात आमदार राऊत अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर तहसिलदार सुनिल शेरखाने, निवासी नायब तहसिलदार संजीवन मुंढे, बार्शी नगपरिषदेचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण, येडेश्वरी शुगर साखर कारखान्याचे चेअरमन बजरंग सोनवणे, पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे, तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारूद परजणे, डॉ.संजय अंधारे, डॉ.अमित पडवळ, बार्शी प्रेस क्लबचे अध्यक्ष अजित कुंकूलोळ उपस्थित होते.पुढे बोलताना राऊत म्हणाले, पत्रकारांनी वस्तुनिष्ठ बातम्या लिहाव्यात ऐकवी व अपुर्‍या माहितीवर लेखन करणे टाळवे. राजकीय बातम्या लिहताना खात्री करून बातमी लिहावी अन्यथा अकाराण रोषाला बळी पडावे लागते. बदलत्या पत्रकारितेमुळे पत्रकारांसमोर विविध समस्या असतात वर्तमानपत्र चालविण्यासाठी आर्थिक घडी बसाववी लागते. अलीकडच्या काळात काही चुकांमुळे पत्रकारितेला वेगळे वळण लागत आहे पत्रकारितेतील अप्रवृत्तींना वेळीच आळा बसणे गरजेचे आहे. बार्शी तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी लोकप्रतिनिधी यानात्याने मी कटीबध्द असून त्यासाठी सर्व प्रकारच्या माध्यातील पत्रकारांनी चुकत असले तर जरूर सांगावे त्यात निश्चित सुधारणा केली जाईल असेही यावेळी राऊतांनी सांगितले. यावेळी  बजरंग सोनवणे यांनी पत्रकार दिनानिमित्त प्रथमच सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होता आल्याचे सांगत पत्रकारांनी सकारात्मक पत्रकारिता करावी असे आवाहन केले. सतत बदलत राहणार्‍या पत्रकारितेच्या नवनवीन प्रवाहात टिकून राहण्यासाठी पत्रकारांनी स्वतःत बदल करणे गरजेचे आहे. इलेक्ट्रॉनिक, डीजीटल व सोशल मिडीयाचे प्रस्थ वाढत असले तरी प्रिंट मिडीयाचे महत्व कमी होत नसून उलट आजच्या डिजीटल युगात प्रिंट मिडीयाचीच विश्वासर्हता जादा असल्याचे मतही सोनवणे यांनी यावेळी व्यक्त करत पत्रकार संघटनेच्या विविध उपक्रमांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी तसहिलदार सुनिल शेरखाने, पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे, डॉ.अंधारे यांच्यासह प्रेस क्लबचे सदस्य सचिन अपसिंगकर, सचिन वायकुळे यांनाही समायोचित भाषण केले. प्रास्ताविकात प्रेस क्लबचे अध्यक्ष कुंकूलोळ यांनी पत्रकारांनी कोरोना काळात केलेल्या कार्याचा आढावा घेत प्रेस क्लबच्या माध्यमातून पत्रकारांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल असे सांगितले. प्रारंभी दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.  सूत्रसंचालन धीरज शेळके यांनी केले तर आभार प्रेस क्लबचे सदस्य शहाजी फुरडे यांनी मानले. राष्ट्रगीतीने कार्यक्रमाची सांगता झाली.  यावेळी छायाचित्रकार सचिन (बंटी) काळे यांचा विशेष सत्कार बार्शी प्रेस क्लबच्या वतीने करण्यात आला. तसेच यावेळी प्रेस क्लब बार्शीच्या सदस्यांना ओळखपत्र वाटप करण्यात आले.

कार्यक्रमासाठी प्रेस क्लबचे सदस्य, साप्ताहिक संपादक संघटनेचे सदस्य, डीजीटल मिडीयाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या