महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : तालुक्यातील गुळपोळी येथील महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ज्यांनी स्त्रियांबद्दल “चुल आणि मुल” ही भावना मोडीत काढतं. स्त्री शिक्षणाचा पाया रोवला. स्रियांना सन्मानाचे जीवन मिळवुन दिलं. आजची स्त्री ही कोणत्याही क्षेत्रांत मागे नाही. स्त्रियांची जीवन शैली ज्यांनी पुर्ण पणे बदलली अश्या “स्त्री शिक्षणाची आराध्य दैवत” भारतातील प्रथम शिक्षिका, प्रथम मुख्यध्यापिका, सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मी केशव भालेराव ग्रामपंचायत सदस्या ( ताडसौदणे ) तर प्रमुख पाहुणे स्वाती अशोक गायकवाड ग्रामपंचायत सदस्या ( मनगोळी – भैरववाडी ) तर प्रमुख उपस्थित प्रकाश शिंदे , अशोक गायकवाड हे होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे स्वाती अशोक गायकवाड ग्रामपंचायत सदस्या आणि लक्ष्मी केशव भालेराव ग्रामपंचायत सदस्याच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालण्यात आला. विविध मान्यवारांचे सत्कार संस्थेकडून करण्यात आले.
त्यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भैरवनाथ चौधरी खजिनदार अशोक गायकवाड सहसचिव आशा आण्णासाहेब भालशंकर, दिक्षा भालशंकर, किरण खुरंगळे , रंजना खुरंगळे , सुभद्रा चौधरी , प्रकाश शिंदे, स्वाती गायकवाड, लक्ष्मी भालेराव , इतर मान्यवर संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. विविध मान्यवरानी आपले मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाची प्रस्तावना आणि आभारप्रदर्शन भैरवनाथ चौधरी सूत्रसंचालन किरण खुरंगळे यांनी केले.