बार्शीत नेपाळच्या पशुपतीनाथ मंदीराचा हुबेहूब देखावा

B1न्यूज मराठी नेटवर्क
माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या हस्ते ‘पशुपतीनाथ मंदीर दर्शन’ या देखाव्याचे उद्धाटन
देखावा पाहण्यासाठी पहिल्याच दिवशी प्रचंड गर्दी
बार्शी : गणेश उत्सवात काळात शहरातील अनेक गणेश मंडळात एका पेक्षा एक नावीन्यपुर्ण देखावे करण्याची स्पर्धा असते नागरिकही मोठ्या प्रमाणात देखावे पाहायला गर्दी करतात. यावर्षी शहरातील रोडगा रस्ता येथील श्री गणेश तरुण गणेश मंडळाने नेपाळच्या काठमांडू येथील प्रसिध्द पशुपतीनाथाचे हुबेहूब मंदिर हा देखावा तयार केला आहे. मंडळाचे आधारस्तंभ महेश यादव यांच्या नेतृत्वातील या मंडळाने बार्शीकरांना नेपाळच्या धार्मिक पर्यटन व दर्शनाची सोय केली आहे.
माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या हस्ते येथील ‘पशुपतीनाथ मंदीर दर्शन’ या देखाव्याचे उद्धाटन सोमवारी करण्यात आले. यावेळी दाजी गुपचे अध्यक्ष उदयशंकर पाटील, औदयोगिक वसाहतीचे चेअरमन सुधीरभाऊ सोपल, युवा नेते आर्यन सोपल, माजी नगराध्यक्ष योगेश सोपल, तात्या चेडे, काका लोखंडे, श्रीमंत थोरात, गणेश नान्नजकर, नागजी नान्नजकर आदी मान्यवर उपस्थित होते. काठमांडू येथील बागमती नदीच्या काठावर असलेले पशुपतीनाथ हे प्रसिद्ध शिवमंदीर आहे. हे हिंदू धर्मियांचं पवित्र तीर्थक्षेत्र असून भगवान शिवशंकरांचं पशु रूपातील मंदिर आहे. पशू म्हणजेच जीव जंतू आणि नाथ म्हणजे स्वामी. संसारातील प्राणीजीवांचे स्वामी अशा अर्थाने पशुपतीनाथ हे नाव या मंदिराला पडले आहे. तर, पुराण काळात पांडवांनी कुरुक्षेत्र युद्ध जिंकल्यानंतर भगवान शंकराची पूजा करून प्रायश्चित्त करण्याचे ठरवले. त्यावेळी, भोलेनाथ यांनी बैलाचा अवतार घेऊन तेथून पळ काढला. पांडवांना सहज दर्शन न देण्याची त्यामागे भावना होती. अखेर बैलाच्या रुपात महादेव भूमिगत झाले, त्यावेळी बलशाली भीमाने बैलाची शेपटी धरण्याचा प्रयत्न केला. तेव्हा, भूमिगत झालेल्या बैलाचे मुख काठमांडू येथून प्रकट झाले, तेच हे पशुपतीनाथ मंदिर अशी आख्यायिका सांगितली जाते.
यंदाच्या वर्षी श्री गणेश तरुण गणेश मंडळाने हा देखावा बार्शीत साकारला असून गेल्या 4 महिन्या पासून या देखावा तयार करण्याचे काम चालू होते. मंडळाचे मुख्य संयोजक संतोष जाधवर यांच्या संकल्पनेतून हा देखावा तयार झाला आहे.मंडळाचे अध्यक्ष अमोल वायचळ,राम घोंगडे, विनोद उमाटे, विरु शिराळ, राम घोंगडे, राम डोंबे, नागेश खळदे, अमोल हिंगमीरे, गणेश यादव , श्रीकांत सुपेकर, अतुल ठोंगे, योगेश करंजकर, सोमनाथ गोसावी, अंकुश नान्नजकर, शंकर पाटील,हरिश वायचळ, संकेत ढोले , भैय्या खळदे ,बाळासाहेब ढोले
आदींसह मंडळाचे सदस्य व कार्यकर्ते यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रविणकुमार गाढवे तर आभार महेश यादव यांनी मानले. देखावा पाहण्यासाठी पहिल्याच दिवशी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली होती.