भारतीय आयुर्विमा महामंडळ , ६७ वा वर्धापनदिना निमित्त विमा रॅली संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : भारतीय आयुर्विमा महामंडळ ( LIC ) या महा संस्थेचा १ सप्टेंबर २०२२ रोजी ६७ वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने विमा रॅली आयोजित करण्यात आली होती. सकाळी ९ वाजता नगर परिषद समोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पासून ते LIC ऑफिस बार्शी येथे रॅली संपन्न झाली. रॅलीचे उदघाटन भारतीय आयुर्विमा महामंडळ, बार्शी शाखेचे वरिष्ठ शाखाधिकारी तुषार घाटगे सर यांचे हस्ते व सांगता शाखेचे वरिष्ठ सहाय्यक लक्ष्मण कुंभार सर यांच्या हस्ते झाली.
शाखेचे विकास अधिकारी उन्मेष पोतदार यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, ” विमा जनजागृती हाच या रॅली मागचा उद्देश आहे, कारण अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजांप्रमाणे विमा ही देखील सर्वांची मूलभूत आर्थिक गरज आहे,.” रॅली मध्ये बहुसंख्येने सामील होऊन अनेक स्त्री विमा एजंट यांचा उत्साहाने घोषणा देण्यात विशेष पुढाकार होता.
विमा रॅली यशस्वी होण्यासाठी विमा प्रतिनिधी मारुती मोरे व सौ. कीर्ती कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.