सामाजिक रूढींची परिसीमा ओलांडणारा रिवणावायली ‘८ एप्रिल’ला चित्रपटगृहात

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : आधुनिक जगतात वावरत असताना स्त्रीला तिच्या हक्कासाठी तिच्या स्वातंत्र्यासाठी लढावं लागत.
असाच एक लढा आता रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. आणि तो म्हणजे रिवणावायली. रिवण म्हणजे वर्तुळ आणि वायली म्हणजे वेगळं; एका वर्तुळात आयुष्य न जगता त्याच्यापासून वेगळं होऊन जगणाऱ्या एका स्त्रीची गाथा रिवणावायली मांडते. अक्षया गुरव ही अभिनेत्री या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. परिसीमा ओलांडणारा रिवणावायली आहे येत्या ८ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.याचंच बंडखोर चित्रण या रिवणावायली मध्ये चित्रित करण्यात आलं आहे. निर्माता दिग्दर्शक डॉ. दिनेश कदम असून छायाचित्रण धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे.या चित्रपटाची कथा प्राध्यापक राजन गवस यांची असून संजय पवार यांनी चित्रपटाची पटकथा लिहिलेली आहे.संगीत पार्थ उमराणी यांचे असून गीत वैभव देशमुख यांनी लिहिले आहेत.चित्रपटात अक्षया सोबत शशांक शेंडे, देविका दफ्तरदार, आकाश नलावडे, संतोष राजेमहाडिक,प्रताप सोनाली आणि कल्याणी चौधरी या कलाकारांची प्रमुख भूमिका आहे.