रातंजन येथे जय महाकाली मातेची मिरवणूक मोठ्या उत्साहात संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : तालुक्यातील रातंजन येथील जय महाकाली मातेची यात्रा मोठ्या उत्साहात भक्तीमय वातावरण संपन्न झाली. श्री अशोक महाराज हे महाकाली मातेची सेवा करतात. जय महाकाली मातेची दर्शन व मिरवणुकीसाठी महाराष्ट्रातून हजारो भाविक भक्त आले होते. सकाळी महाकाली मातेचा पंच अमृताने महाभिषेक करण्यात आला. त्याचबरोबरआरती करण्यात आली. मंदिराला आकर्षक फुलांनी सजवले होते.
दुपारी 3 वाजता महाकाली मातेची मिरवणूकीस सुरवात करण्यात आली. बगिला आकर्षक फुलांनी सजवले होते. महाकाली मातेची मूर्ती गावातून वाजत गाजत मिरवणूक करण्यात आली. देवीच्या गाण्यावर भाविक भक्तांनी आनंद साजरा केला. या मिरवणुकीत तृतीय पंती आणि वारुवाले (वाघ्या मुरळी ) सहभागी झाले होते. श्री अशोक महाराज यांच्या सर्व शिष्यानी भगवी व पांढरी कपडे परिधान केली होती. गावात जय महाकाली मातेचा जय जयकर करण्यात आला. अनेक ठिकाणी मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. मिरवणूकीचे आयोजन श्री अशोक महाराज प्रतिष्ठा , महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने काढण्यात आली.
महाकाली मंदिरात संध्याकाळी महा आरती करण्यात आली. त्यावेळी भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती. भाविक भक्तांनी आरतीनंतर भोजनाचा स्वाद घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बापू नागटिळक, सिद्राम नागरगोजे , सूरज रसाळ , विष्णू शिंदे, योगेश इंगळे , गौतम वाघमारे , अरविंद आतकरे , पवन अडसूळ , सतिश वाघमारे, सागर पारडे, जनक कोळी, शिवलिंग स्वामी, अभय हिवरे, ओंकार कांबळे, आकाश बनसोडे, भैरवनाथ चौधरी , श्रीराज हाजारे, बबलू काटकर , विक्रांत चव्हाण, परमेश्वर बिले, महेश जाधव , शशिकांत जाधव, गणेश लंगोटे, दिलकुश क्षीरसागर , दादा लोंढे , अक्षर राऊत,किरण डोलारे , समाधान दावरी, निलेश गिराम विजय गुजर,सौरभ गाडे, बापू रोकडे, अमर काळे, विश्वनाथ वाघमारे , दत्ता माळी , विशाल माऊलीकर, गौतम नागटिळक , बिरु नागटिळक , इतर भक्तांनी परिश्रम घेतले.