महाराष्ट्ररायगड

रायगड पोलीस दलाच्या बाईक रॅलीद्वारे ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ उपक्रमाची जनजागृती बाईक रॅली संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क

रायगड : दि.07मार्च : महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या (MWCD) ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ (BBBP) या उपक्रमाला 10  वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, तसेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रायगड जिल्हा पोलीस दलामार्फत आयोजित बाईक रॅलीला जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून हिरवा झेंडा दाखवून या रॅलीला प्रारंभ केला.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टवाड, जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधिक्षक अभिजित शिवथरे आदी मान्यवर उपस्थित होते.

ही बाईक रॅली महिला सुरक्षा, शिक्षण आणि सशक्तीकरणाविषयी जनजागृती करण्यासाठी काढण्यात आली. BBBP उपक्रमाच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांत लिंगभेद चाचण्यांवर नियंत्रण, मुलींचे संरक्षण आणि शिक्षणास प्रोत्साहन देण्यात मोठे योगदान दिले गेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button