अपहरण करून गंभीर मारहाण केलेच्या आरोपातून चार आरोपींचा जामीन मंजूर

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : शहर पोलिस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ११३/२०२५ नुसार आरोपी राज नागनाथ कांबळे,यश निलेश शिंदे,आर्यन निलेश शिंदे,आदित्य दत्तात्रय सावंत यांनी फिर्यादी लखन भारत शिंदे यास अपहरण करून जबर दुखापत व जीवे मारण्याचा प्रयत्न केलेच्या आरोपावरून बीएनएस कलम -१४० (४), १३७(२),११८(२),११८(१),११५(२),३५१(२),३५१(३),३(५) प्रमाणे गुन्हा दाखल होता.

सदर संशयित आरोपींच्या वतीने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी साहेब यांच्या न्यायालयात अ‍ॅड.विवेक गजशिव व अ‍ॅड. राहुल पाटील यांच्यावतीने जामीन अर्ज दाखल केला होता. यावेळी आरोपींचे वकील अ‍ॅड.विवेक गजशिव यांनी जोरदार युक्तिवाद करून आरोपींना खोट्या गुह्यात गोवले आहे.फिर्यादीने फिर्यादीत सांगितलेली वेळ आणि मेडिकल रिपोर्टमध्ये सांगितलेल्या वेळेत तफावत आहे. फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीत हत्यारांचा उल्लेख आहे तसा उल्लेख मेडिकल रिपोर्टमध्ये नाही. फिर्यादीने खोट्या गुह्यात चारही आरोपींना नाहक त्रास देण्याच्या अनुषंगाने गुंतविले असून सदरची फिर्याद ही खोटी असल्याचा युक्तिवाद यावेळी आरोपींचे वकील अ‍ॅड. विवेक गजशिव यांनी केला.

यावेळी अ‍ॅड.विवेक गजशिव यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी साहेब मा.न्यायधीश गायत्री पाटील यांनी वर नमूद चारही आरोपींचा जामीन अर्ज मंजूर केला. यावेळी आरोपींच्यावतीने अ‍ॅड.विवेक गजशिव,अ‍ॅड.राहुल पाटील,अ‍ॅड.श्रीराम काशीद यांनी काम पाहिले तर सरकार पक्षाच्यावतीने सरकारी वकील अ‍ॅड.रत्नदीप सोनवणे यांनी कामकाज पाहिले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या