बार्शी

गौडगाव येथे बैल-पोळा सणानिमित्त बैल-जोडी सजावट स्पर्धेमधील विजेता शेतकऱ्यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान

B1न्युज मराठी नेटवर्क / गौतम नागटिळक

वैराग : गौडगाव येथे बैल-पोळा सणानिमित्त ग्रामपंचायतीच्या वतीने बैल-जोडी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गौडगाव गावातील ५९ बैल-जोडीची नोंदणी करण्यात आली होती. उत्कृष्ट बैल-जोडी सजावट स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय आणि प्रोत्साहनपर अशा चार विभागातून क्रमांक काढून ग्रामपंचायतच्या वतीने शेतकऱ्यांचा प्रमाणपत्र, फेटा, हार, श्रीफळ आणि रोख स्वरूपात बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आला.
प्रथम क्रमांक शहाजी नामदेव भड, द्वितीय क्रमांक संजय उत्तम गरड, तृतीय क्रमांक नितीन अंकुश माने आणि प्रोत्साहनपर महेश प्रकाश आरगडे या शेतकऱ्यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सन्मान करण्यात आला.
सरपंच बालाजी पैकेकर, सदस्य नागेश काजळे, मदन आरगडे, यशवंत शिंदे आणि ग्रामसेवक संतोष माने यांच्या उपस्थिती मध्ये मान्यवर शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी राहुल भड, युवराज काजळे, संभाजी भड, धनराज काजळे, प्रभाकर भड, अभिमन्यू पाटील, जीवन भड, हनुमंत भड, संतोष भड, दत्तात्रय भड, राजेंद्र बोंगाणे, बालाजी भड आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button