स्मशानभूमीच्या जागेची अधिकृत मोजणी , गुळपोळी ग्रामपंचायत कडे कागदोपत्री वर्ग करण्याची मागणी , प्रांताधिकारी , जिल्हाधिकारी यांना निवेदन

B1न्युज मराठी नेटवर्क
बार्शी : गुळपोळी येथील गट क्र. 519 मधील स्मशानभूमीसाठी आरक्षण असलेले जागा अधिकृत मोजणी करून ग्रामपंचायत गुळपोळी यांचे नावे कागदोपत्री वर्ग करण्यात यावी मागणीचे निवेदन प्रांतधिकारी निकम व जिल्हाधिकारी शंभरकर यांना देण्यात आले.
त्यावेळी युवा नेते उद्योजक श्रीकांत मचाले, उपसरपंच निरंजन चिकणे , ग्रामपंचायत सदस्य कृष्णा चिकणे , कैलास माळी, अमोल नरखडे उपस्थित होते. हा विषय गेल्या 35 वर्षांपासून प्रलंबित होता. तो मार्गी लागण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे.