ख्रिश्चन एकता मंचच्या महाराष्ट्र प्रदेश युवा अध्यक्ष पदी राकेश नवगिरे यांची निवड

B1न्युज मराठी नेटवर्क
बार्शी : राकेश नवगिरे ह्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत ते ह्याप्रमाणे , डिसेंबर २०१६ रोजी नाताळ निमित्ताने रक्तदान शिबीर व मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले, २६ जानेवारी २०१७ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त बार्शीतील सर्व पोलिसांचा सत्कार करण्यात आला, ८ मार्च २०१७ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त बार्शीतील विविध क्षेत्रातील मान्यवर महिला चा सत्कार करण्यात आला, बार्शी कुर्डुवाडी खडे मुक्त रस्ता साठी ख्रिश्चन महासंघ बार्शी टीम ने सर्व प्रथम फेसबुक लाईव्ह वर वेगळ्या पद्धतीने आंदोलन केले, ५ ऑक्टोबर २०१७ रोजी आध्यात्मिक सभा घेण्यात आली, डिसेंबर २०१७ रोजी नाताळ निमित्ताने रक्तदान शिबीर व मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले, २८ जानेवारी २०१८ प्रजासत्ताक दिनानिमित्त समाजसेवकाचे भव्य सत्कार समारंभ करण्यात आला, सांगली, कोल्हापूर महापुरात जीवनावश्यक वस्तू वाटप केले.
करोना च्या महामारीत ‘आर एन सामाजिक संस्थे च्या माध्यमातून बार्शीतील रेड लाईट व बार्शी मधील इतर ठिकाणी व सोलापूर शहरा मध्ये अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू वाटप केले, करुणा धनंजय मुंढे व करीना कपूर खान यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकात “Holy Bible” या शब्दाचा गैर वापर केला होता त्यावर तक्रार दाखल केली अश्या अनेक प्रश्नांवर नवगिरे यांनी आवाज उठविला आहे, राकेश नवगिरे हे काँग्रेस अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष बार्शी ह्या पदावर हि काम करतं आहे, सामजिक व राजकीय काम करतांना ख्रिश्चन युवकांना राजकारणा मध्ये सक्षम करण्याचे काम आपण करणार आहोत सोबतच रोजगार नि्मितीसाठी मार्गद्शन देखील करणार आहेत व जिथे जिथे ख्रिश्चन समाजावर अन्याय होईल तिथे ख्रिश्चन एकता मंच संपुर्ण ताकतीने सामोरे जाऊ असेही राकेश नवगिरे यावेळी बोलत होते.