बार्शी फोटोग्राफर असोसिएशनच्या अध्यक्षपदी बंटी काळे यांची तर उपाध्यक्षपदी सनी बलदोटा व सहसचिवपदी पप्पू बागल यांची निवड

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : संघटनेतील सर्व पदाधिकारी व कार्यकारिणीला विश्वासात घेऊन चांगले उपक्रम राबविण्यात येतील असे नूतन अध्यक्ष बंटी काळे यांनी सांगितले. बार्शी मध्ये समृद्धी लॉन्स येथे घेण्यात आलेल्या नूतन पदाधिकारी निवडीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राजेश वानखेडे, राहुल सातपुते, अमोल उमाप, लक्ष्मण जाधव आदी उपस्थित होते. यावेळी बार्शी फोटोग्राफर असोसिएशन च्या बॅनरखाली सर्व फोटोग्राफर्सनी एकत्रित येण्याचं आवाहन राजेश वानखेडे यांनी केले. माजी अध्यक्ष राहुल सातपुते बोलताना म्हणाले की माझ्या कार्यकाळात लॉकडाऊन असल्यामुळे मला ऑनलाईनच कार्यक्रम घ्यावे लागले इथून पुढील कार्यक्रम ऑफलाईन व्हावेत अशी अपेक्षा त्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केली. पुढे बोलताना बंटी काळे म्हणाले की सध्याच्या डिजिटल युगात व आधुनिक तंत्रज्ञानाचा विचार करून फोटोग्राफीतील कौशल्य वाढवण्याचा प्रयत्न असेल. शहर व तालुक्यातील सर्वांना एकत्रित करून संघटन मजबूत करण्याबरोबरच त्यांच्या ज्ञानात भर घालण्याचा प्रयत्न असेल यासाठी नामांकित ट्रेनर यांचे वर्कशॉप घेण्यात येतील.

नवनवीन कॅमेरा व प्रिंटर्स यांचे प्रदर्शन घेणार आहोत ज्यामुळे कॅमेरा व इतर वस्तू हाताळताना योग्य व अयोग्य याची अचूक निवड करता येईल त्याच बरोबर बिझनेस डेव्हलपमेंट पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आदि विषयांवर चांगल्या व्याख्यात्यांचं मार्गदर्शन घेण्यात येईल.कोरोनाच्या काळात अनेक कुटुंबांवर आलेल्या संकटाचा विचार करून संघटनेच्यावतीने स्टार हेल्थ इन्शुरन्स चे मॅनेजर जितेश गांधी यांनी मेडिक्लेम संदर्भात सदस्यांना मार्गदर्शन केले फोटोग्राफी साहित्यांचे वाढलेले दर व वाढती महागाई यामुळे दरवाढ करण्याचा निर्णय सर्वांच्या सहमतीने घेण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकारिणी मंडळ यांनी परिश्रम घेतले. सदरील कार्यक्रमाला बहु संख्येने फोटोग्राफर बांधव उपस्थित होते.अंकुश कंगले यांनी आभार प्रदर्शन केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या