भटक्या विमुक्तांच्या मेळाव्यास उपस्थित रहावे असे आव्हान : मच्छीद्र भोसले

0

B1न्युज मराठी नेटवर्क

बार्शी : सोलापूर येथे महाराष्ट्रातील भटक्या , विमुक्त लोकांचा 31 तारखेला मेळावा भरवण्यात आला आहे.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे मच्छीद्र भोसले , गजेंद्र भोसले होते तर प्रमुख उपस्थिती विरेंद्र कांबळे , संजय चव्हाण , मंगलाताई देशमुख होत्या. विविध मान्यवरांचे यावेळी सत्कार केले.सर्वांनी मनोगत व्यक्त केली. बार्शी तालुका समन्वय म्हणून अखिल भारतीय नाथपंथी डवरी गोसावी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय चव्हाण यांची निवड करण्यात आली. या बैठकीमध्ये नाथपंथी डवरी समाज , वासुदेव माकडवाले ,भटके, सोनार , कैकाडी , धनगर इत्यादी समाज उपस्थित होता. यावेळी महाराष्ट्र शासनाच्या कलाकार कमिटीवर मच्छीद्र भोसले यांनी निवड झाल्याबद्दल बार्शी तालुका सर्व कलाकारांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

सोलापूर येथे होणाऱ्या भटक्या विमुक्तांचा मेळाव्यास उपस्थित रहावे असे आव्हान मच्छीद्र भोसले यांनी केले. यावेळी बाळनाथ जाधव , राजेंद्र चव्हाण ,भोला अडसूळ , आंबरुषी केळेकर , नवनाथ गायकवाड , शिवाजी कासार , दत्ता खंदारे , इमान पठाण , अक्षय जाधव , सचिन निंबाळकर इतर मान्यवर उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या