दलित महासंघाच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येणा-या दलित मित्र व कोरोणा योद्धा पुरस्कार वितरण

B1न्युज मराठी नेटवर्क
बार्शी : समाजात कौतुक करणा-यांची संख्या कमी होत चालली असली तरी दलित महासंघ मात्र प्रतिवर्षी गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचे काम करत आहे असे प्रतिपादन दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्र सकटे यांनी केले.ते बार्शीतील यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृहात दलित महासंघाच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येणा-या दलित मित्र व कोरोणा योद्धा पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी आ.राजेंद्र राऊत होते. व्यासपीठावर शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डाॅ.बि.वाय.यादव,उपाध्यक्ष नंदन जगदाळे,नगराध्यक्ष असिफ तांबोळी,नायब तहसीलदार संजीवन मुंढे, डाॅ.अमित पडवळ,शंकर वाघमारे,श्रीधर कांबळे,संजीव बगाडे, जिल्हाध्यक्ष सुनिल अवघडे,शहराध्यक्ष संदीप आलाट,नवनाथ चांदणे,बप्पा कसबे,निलेश खुडे,संगीतराव शिंदे,संतोष बगाडे आदी उपस्थित होते.
सकटे पुढे बोलताना म्हणाले की अलिकडे कौतुक नावाची गोष्ट कमी होत चालली आहे.समाजासाठी काम करणा-याचे कौतुक व्हावे या हेतुने दलित महासंघ ही संघटना काम करते.त्यामुळे सामाजिक योगदान देणा-यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचे काम केले जाते. दुबळ्यांचा मित्र होणा-याचाच गौरव हाच खरा गौरव असतो.पुर्वीप्रमाणेच आजही समाजात प्रश्न तसेच आहेत मात्र आज लढायला कोणीच तयार नाही.
आ.राजेंद्र राऊत अध्यक्षस्थानावरून बोलताना म्हणाले की सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी असणा-यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.कोरोणा सह आपल्या क्षेत्रात योगदान देणा-यांचा दलित मित्र, कोरोणा योद्धा म्हणून सन्मान केला हे कौतुकास्पद आहे.लहानपणापासून दलित समाजाचा जवळचा संबंध आहे.झटणारा कार्यकर्ता असल्यास परिस्थिती बलण्यास वेळ लागत नाही.समाजातील परिस्थितीची पहाणी करूण सुशिक्षित बेरोजगारांसह गरजुंना न्याय देण्यासाठी समाजातील पुढारलेल्या लोकांनी प्रयत्न करावेत असेही आ. राऊत म्हणाले. डाॅ.बि.वाय.यादव म्हणाले की सन्मानित करण्यात आलेले सर्वजन आपआपल्या क्षेत्रातील नामांकित आहेत.पुरस्कारासाठी योग्य लोकांची निवड करण्यात आली असुन बार्शीत आण्णाभाऊ साठे यांचे स्मारक व्हावे.
प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष सुनिल अवघडे यांनी पुरस्कार देण्यामागचा उद्देश विषद केला.नवनाथ चांदणे, संदीप आलाट,श्रीधर कांबळे,विजयाश्री पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.सुत्रसंचालन निता देव यांनी तर आभार संदिप आलाट यांनी मानले.
यांचा झाला सन्मान;-
पुरस्कार;-
जिवन गौरव पुरस्कार;- नंदन जगदाळे
सेवा पुरस्कार;- कमलेश मेहता व डाॅ.अमित पडवळ
कोरोणा योद्धा पुरस्कार;- सपोनी शिवाजी जायपत्रे,तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.अशोक ढगे, बार्शी न.पा. स्वच्छता निरीक्षक शब्बीर वस्ताद
विशेष गौरव;- प्रशांत पैकेकर, अमृत गुगळे,संदेश काकडे
दलित मित्र गौरव 2021 मानकरी ;-
संजीवन मुंढे,सतिश सातुपते,सचिन झालटे,सौ.विजयाश्री पाटील,वैभव पाटील,गणेश गोडसे(पत्रकारीता),योगेश लोखंडे