पुण्यतिथीसामाजिकसोलापूर

कै.सौ. मनकर्णिका हरिश्चंद्र पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त पाटील परिवाराकडून शालेय साहित्य वाटप

३१ तारखेला भव्य रक्तदान शिबिरांचे व किर्तनाचे आयोजन , प्रथम पुण्यस्मरणा निमित्त विविध सामाजिक उपक्रम

B1न्यूज मराठी नेटवर्क

प्रतिनिधी : अशोक गायकवाड

मोहोळ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भैरववाडी- मनगोळी येथील विद्यार्थ्यांना कै.सौ. मनकर्णिका हरिश्चंद्र पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्त पाटील परिवाराकडून शालेय साहित्य वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष बळीराम सुसलादे तर प्रमुख पाहुणे सरपंच अशिष खोत प्रमुख उपस्थिती ग्रामपंचायत सदस्य भाऊराव खांडेकर , ग्रामपंचायत
सदस्य अशोक गायकवाड , आबा वाघ , इतर मान्यवर उपस्थित होते. बजरंग हरिचंद पाटील ,हनुमंत हरिचंद पाटील, बळीराम हरिचंद पाटील समस्त पाटील परिवार कार्यक्रमाला उपस्थित राहून त्यांनी एक सामाजिक उपक्रम राबवला आहे. या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
३१ तारखेला भव्य रक्तदान शिबिरांचे व किर्तनाचे आयोजन केले आहे. यावेळी विविध मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. त्यावेळी किशोर सुसलादे ,दिलीप खांडेकर , बाळासाहेब वाघ, सुभाष मरे, धनाजी पाटील, मनोज सुसलादे , राजाभाऊ खोत, अशोक खोत, महादेव येमले, पप्पू पाटील, रमेश खोत, रोहन खांडेकर, नागनाथ ‘खोत, शिक्षक सदाशिव सुरवसे , विश्वास शेंडगे , नंदा खांडेकर, इतर मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. पाटील परिवाराकडून भव्य रक्तदान शिबिरांचे व किर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button