औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे अवमान थांबवून वेतन त्वरित द्यावेत अन्यथा निदर्शन करणार ; संघर्ष एसटी कामगार युनियनचे अध्यक्ष नितीन गवळी

0

B1न्युज मराठी नेटवर्क

बार्शी : राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांना मे २०२१ पासून नियमित तारखेला वेतन मिळत नाही तसेच औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे अवमान थांबवून वेतन त्वरित द्यावेत नाहीतर बार्शी आगारा समोर सोमवारी (ता. ३०) निदर्शन करण्यात येणार असल्याचा इशारा संघर्ष एस. टी. कामगार युनियनचे अध्यक्ष नितिन गवळी यांनी दिला आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांना मे महिन्यापासून नियमित वेतन मिळत नाही. औद्योगिक न्यायालयाने १४ ऑगस्ट रोजी आदेश देऊनही आजतागायत झाले नाही. त्यामुळे एस. टी. कामगारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. त्यामुळे संघर्ष एस. टी. कामगार युनियनच्या वतीने बार्शी आगारासमोर सामाजिक अंतर ठेऊन सोमवारी निदर्शन करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार बार्शी पोलिस ठाण्यात व बार्शी एस. टी. डेपोचे आगार प्रमुख मोहन वाकळे यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी अध्यक्ष नितीन गवळी, उपाध्यक्ष राहुल सांगळे, धनराज पाटील, सचिव शरद सातपुते, सहसचिव प्रवीण बारवकर, श्रीपाद घोळवे कार्याध्यक्ष आदित्य अडसूळ, गणेश गोरे, संघटक सचिव अकबर सय्यद, सुजित जगदाळे, सचिन कदम, आदि संघर्ष एस टी कामगार युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे अवमान थांबवून वेतन त्वरित द्यावेत अन्यथा निदर्शन करणार ; संघर्ष एसटी कामगार युनियनचे अध्यक्ष नितीन गवळी जनसत्ता लाईव्ह :- बार्शी :- राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांना मे २०२१ पासून नियमित तारखेला वेतन मिळत नाही तसेच औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे अवमान थांबवून वेतन त्वरित द्यावेत नाहीतर बार्शी आगारा समोर सोमवारी (ता. ३०) निदर्शन करण्यात येणार असल्याचा इशारा संघर्ष एस. टी. कामगार युनियनचे अध्यक्ष नितिन गवळी यांनी दिला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांना मे महिन्यापासून नियमित वेतन मिळत नाही. औद्योगिक न्यायालयाने १४ ऑगस्ट रोजी आदेश देऊनही आजतागायत झाले नाही. त्यामुळे एस. टी. कामगारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. त्यामुळे संघर्ष एस. टी. कामगार युनियनच्या वतीने बार्शी आगारासमोर सामाजिक अंतर ठेऊन सोमवारी निदर्शन करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार बार्शी पोलिस ठाण्यात व बार्शी एस. टी. डेपोचे आगार प्रमुख मोहन वाकळे यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. यावेळी अध्यक्ष नितीन गवळी, उपाध्यक्ष राहुल सांगळे, धनराज पाटील, सचिव शरद सातपुते, सहसचिव प्रवीण बारवकर, श्रीपाद घोळवे कार्याध्यक्ष आदित्य अडसूळ, गणेश गोरे, संघटक सचिव अकबर सय्यद, सुजित जगदाळे, सचिन कदम, आदि संघर्ष एस टी कामगार युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या