बार्शी

बार्शी : 29 ऑगस्ट रोजी दलित महासंघाचा पुरस्कार वितण सोहळा

B1न्युज मराठी नेटवर्क

बार्शी : – दलित महासंघाच्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षी प्रमाणेच देण्यात येणारे यावर्षीचे राज्यस्तरीय दलित मित्र गौरव पुरस्कार जाहीर झाले असुन येत्या रविवारी दि.29 ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता बार्शीतील यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक सभागृहात या पुरस्काराचे मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण होणार असल्याची माहिती दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुनील अवघडे व शहराध्यक्ष संदीप आलाट यांनी दिली.


दलित महासंघाचे संस्थापक मच्छिंद्र सकटे यांच्या हस्ते व आ.राजेंद्र राऊत यांच्या अध्यक्षतेखाली, तहसीलदार सुनील शेरखाने,मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील, नगराध्यक्ष असिफ तांबोळी,शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डाॅ.बी .वाय.यादव,ज्येष्ठ पत्रकार राजा माने या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण होणार आहे.यावेळी नवनाथ चांदणे,श्रीधर कांबळे,आशाताई लोंढे,शंकरराव वाघमारे,अमोल चव्हाण, किरण तौर, बप्पा कसबे,संजीव बगाडे,संगीतराव शिंदे,निलेश खुडे उपस्थितीत राहणार आहेत. आजपर्यंत 48 व्यक्तींना दलित मित्र पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button