बार्शी

बार्शी : व्यसनमुक्तीची शपथ घेताना गौडगाव ग्रामस्थ

वैराग प्रतिनिधी / गौतम नागटिळक

बार्शी : गौडगाव येथील ग्रामपंचायती च्या वतीने व्यसनमुक्त ग्राम अभियान या स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे. १० ऑगस्ट पासून व्यसनमुक्त ग्राम अभियानाच्या वतीने व्यसनमुक्ती ग्रामसभा, व्यसनमुक्ती महिला मेळावा, विद्यार्थी जनजागृती, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पटनाट्य, व्यसनमुक्ती दिंडी तसेच आयुष्यभर दारू न पिणाऱ्या व्यक्तींचा सत्कार, दारू सोडणाऱ्या व्यक्तींचा सत्कार अशा विविध उपक्रम ग्रामपंचायतच्या वतीने राबवण्यात येत आहेत.


आज गौडगाव गावातील मुख्य चौकात तरुण, ज्येष्ठ मंडळी एकत्र येऊन व्यसनमुक्तीची शपथ घेण्यात आली तसेच बार्शी येथील समाज प्रबोधनकार मा. देवा चव्हाण यांनी व्यसनमुक्तीवर ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच बालाजी पैकेकर, उपसरपंच हिराचंद शिंदे, सामाजिक कार्यकर्ते राहुल भड, सदस्य सुशांत सुरवसे, भास्कर काकडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button