निवडसोलापूर

महापालिका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी किरण बनसोडे तर सरचिटणीसपदी प्रमिला चोरगी

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : महापालिका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी किरण बनसोडे , सरचिटणीसपदी प्रमिला चोरगी तर खजिनदारपदी चंद्रकांत मिराखोर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

महापालिका पत्रकार संघाची वार्षिक सभा गुरुवारी पार पडली. यावेळी या निवडी करण्यात आल्या मावळते अध्यक्ष राकेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. इतर पदाधिकारी असे – उपाध्यक्ष – अजित उंब्रजकर, आफताब शेख, चिटणीस – विशाल भांगे, रोहन श्रीराम, संदिप वाडेकर.

कार्यकारणी सदस्य – आप्पासाहेब पाटील, सलमान पिरजादे, विकास कस्तुरे, अभिषेक अदेप्पा, यशवंत गुरव, बालाजी चिटमिल, प्रभू वारशेट्टी, आयुब कागदी सल्लागार प्रशांत जोशी, प्रशांत माने, समाधान वाघमोडे, सादिक इनामदार आदी.

याप्रसंगी नूतन पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. वर्षभरात विविध उपक्रम राबविण्याचा मानस नूतन पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button