अपघातअहिल्यानगर

समृद्धीवर भीषण अपघात; समृद्धी महामार्गावर अपघातात २ ठार, १ जखमी

B1न्यूज मराठी नेटवर्क

अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत असून पुन्हा एकदा एक भीषण अपघात झाला आहे. शिर्डीहुन छत्रपती संभाजीनगरकडे येत असताना हा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. जखमीला जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही कार अतिवेगाने शिर्डीकडून छत्रपती संभाजीनगरकडे येथे जात असतांना मागील उजव्या बाजूचे टायर हे तुटून बाजूला गेल्या गाडीवरील ताबा सुटला आणि कार पलटी झाली. अपघात झाला त्यावेळी कारमध्ये एकूम ३ जण होते.

यात तीन जणांपैकी २ जणांचा मृत्यू झाला असून १ जण जखमी आहे. जखमी व्यक्तीला तात्काळ ॲम्बुलन्स मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे पुढील उपचारासाठी पाठवले आहे. सुर्यकांत वडणे असे जखमी व्यक्तीचे नाव आहे तर अनिज शेख आणि प्रतीक देशमुख अशी मृत व्यक्तीची नावे आहेत. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button