अहिल्यानगरमहाराष्ट्र

भारनियमन आणि पाणीटंचाईच्या बाबतीत गांभीर्याने उपाययोजना कराव्यात – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

जनता दरबारामध्ये जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या

B1न्यूज मराठी नेटवर्क

शिर्डी : “टंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन महसूल, महावितरण आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने लोकांच्या भावना समजून घ्याव्यात. ग्रामीण भागातील भारनियमन कमी करण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. पंचायत समितीच्या माध्यमातून टँकरचे सुयोग्य नियोजन करून पाणीपुरवठा करण्याबाबतही चोख व्यवस्था करावी,” असे निर्देश जलसंपदा तथा पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

लोणी येथील जनसंपर्क कार्यालयात दुपारी २ ते रात्री ८ वाजेपर्यंत जनता दरबाराच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्या प्रश्नांची निवेदने स्वीकारली. राहता उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी किरण सावंत, श्रीरामपूरचे तहसीलदार मिलिंद वाघ, संगमनेरचे तहसीलदार मुंडे, राहता तहसीलदार मोरे,राहुरी तहसीलदार यांच्यासह कृषी, विभाग, अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.500नागरिकांची निवेदने स्वीकारल्यानंतर अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन प्राप्त झालेल्या नागरिकांच्या सर्व निवेदनांवर तात्काळ कार्यवाही करून, त्यांना त्याबाबतचे अहवाल कळवावे, असे निर्देश दिले. या बैठकीस सर्व विभागांचे आधिकारी उपस्थित होते.

जनता दरबारामध्ये प्रामुख्याने भारनियमनाच्या मोठ्या प्रमाणात प्राप्त झालेल्या तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेऊन मंत्री विखे पाटील यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना या संदर्भात अतिशय जागरूकतेने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. बहुतेक ठिकाणी रोहित्रांचे प्रश्न निर्माण झाल्याने भारनियमनाचे प्रमाण वाढले आहे. अनेक गावांमध्ये कृषी आणि गावठाण फिडर एकत्रित झाल्यामुळे सुद्धा भारनियमनाचे संकट वाढल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. या संदर्भात वीज वितरण कंपनीच्या सर्व अधिकाऱ्यांनी आपल्याकडील जबाबदारी असलेल्या गावांचा प्रत्यक्ष सर्व्हे करून सविस्तर अहवाल सादर करावा. दिनांक २४ सप्टेंबर रोजी वीज वितरण कंपनीची स्वतंत्र बैठक घेऊन पुन्हा त्याबाबतचा सविस्तर आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button