आजपासून डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त कर्मवीर सप्ताह

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शीचे संस्थापक कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या वी १२० जयंतीनिमित्त संस्थेच्या सर्व शास्त्रांमध्ये कर्मवीर सप्ताह साजरा होत आहे. या महोत्सवात संस्थेच्या सर्व शाखांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गुरुवार, दि. २ रोजी जीवन सुंदर आहे. या विषयावर गणेश शिंदे यांचे व्याख्यान, दि. ३ रोजी कर्मवीर जगदाळे यांच्या धर्मपत्नी स्व. लक्ष्मीबाई जगदाळे यांच्या पुतळ्याचे अनावरण कलगरू डॉ. मणालिनी फडणवीस व इंदुमती जोंधळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यानंतर सेवानिवृत्त कर्मचारी पीएच.डी. धारक, गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार होणार आहे.
दुपारी संस्थेच्या विविध शाखांचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम होईल. दि. ४ फेब्रुवारीला सकाळी आठ जनजागरण मिरवणूक होईल. समाज दिनाचा मुख्य कार्यक्रम दुपारी ४ वाजता शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्रांगणात आहे. या
कार्यक्रमात वीरमाता, वीरपत्नी यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
कार्यक्रमांचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष नंदकुमार जगदाळे, सचिव पी. टी. पाटील, सहसचिव, अरुणकुमार देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे यांनी केले आहे.