उद्घाटनक्रीडा विषयकमहाराष्ट्रसोलापूर

मेरा युवा भारत जिल्हास्तरीय स्पर्धा उत्साहात संपन्न

मेरा युवा भारत क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करताना वृषाली चालुक्य, प्राचार्य इस्माईल शेख, धनंजय धेंडे, सत्यम जाधव, सुभाष चव्हाण आदी.

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

सोलापूर : मेरा युवा भारत व सोलापूर स्पोर्ट्स अकॅडमी, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा शासकीय मैदान, नेहरूनगर येथे अतिशय उत्साही वातावरणात संपन्न झाल्या.

या स्पर्धेचे उद्घाटन सोलापूर महानगरपालिकेच्या नवनियुक्त स्वीकृत सदस्य वृषाली चालुक्य (नगरसेविका), प्राचार्य इस्माईल शेख (अहिल्याबाई प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, सोलापूर), क्रीडा अधिकारी सत्यम जाधव, राजेंद्र कुलकर्णी, धनंजय धेंडे (संचालक, सोलापूर स्पोर्ट्स अकॅडमी), वैभव कुलकर्णी तसेच मेरा युवा भारतचे समन्वयक सुभाष चव्हाण आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.50000या स्पर्धेमध्ये माढा, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, उत्तर सोलापूर इत्यादी तालुक्यांतील खेळाडूंनी खो-खो, कबड्डी, १०० मीटर धावणे, गोळाफेक, लांब उडी, स्लो सायकलिंग आदी क्रीडा प्रकारांत सहभाग घेतला. सुमारे ८० खेळाडूंनी आपली उपस्थिती नोंदवली.5000यावेळी खेळाडूंना शुभेच्छा देताना नगरसेविका वृषाली चालुक्य म्हणाल्या की, युवकांनी मोठ्या प्रमाणात क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन आपले कौशल्य सिद्ध करावे आणि देशाचे नाव उज्ज्वल करावे.50000या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय धेंडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन अकॅडमीचे सचिव वैभव कुलकर्णी यांनी केले. सदर कार्यक्रम जिल्हा युवा समन्वयक राहुल डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.50000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button