नवी दिल्लीमहाराष्ट्रसांस्कृतिक

एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत ‘लोकोत्सव’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई व महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक भारत श्रेष्ठ भारत अंतर्गत ‘लोकसंस्कृतीचा लोकोत्सव’

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

नवी दिल्ली : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई तसेच महाराष्ट्र परिचय केंद्र, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमांतर्गत महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडविणाऱ्या ‘लोकोत्सव’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम दि. १९ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेपर्यंत सभागृह, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला आहे.50000‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या उपक्रमाचा उद्देश देशातील विविध राज्यांमधील सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवून राष्ट्रीय एकात्मता अधिक दृढ करणे हा आहे. त्याच अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकोत्सव’ या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील विविध लोककला, लोकगीत, लोकनृत्य तसेच पारंपरिक वाद्यसंगीत यांचे आकर्षक सादरीकरण करण्यात येणार असून महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचे दर्शन रसिकांना घडणार आहे.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लोकपरंपरा, सांस्कृतिक वारसा आणि पारंपरिक कलांचा परिचय देशभरातील प्रेक्षकांना करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.50000सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई आणि महाराष्ट्र परिचय केंद्र, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा कार्यक्रम महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री मा. ॲड. आशिष शेलार आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.5000दिल्ली व परिसरातील महाराष्ट्रप्रेमी नागरिक, विद्यार्थी, सांस्कृतिक संस्थांचे पदाधिकारी तसेच रसिक प्रेक्षकांनी या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button