नोकरीबार्शीमहाराष्ट्र

युवकांसाठी संधी! माधवबाग बार्शी येथे 2 पदांसाठी भरती

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

बार्शी : शहरातील आयुर्वेदिक आरोग्य सेवेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या माधवबाग आयुर्वेद कार्डिअक क्लिनिककडून नोकरीची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. क्लिनिकच्या बार्शी शाखेत ‘पंचकर्म थेरपिस्ट’ या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली असून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.5000जाहिरातीनुसार, पुरुष उमेदवारांसाठी एकूण २ पदे उपलब्ध आहेत. उमेदवार किमान १० वी किंवा १२ वी उत्तीर्ण असावा. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा सुमारे १२,००० रुपये वेतनासह अतिरिक्त सुविधा दिल्या जाणार आहेत.5000या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना आयुर्वेदिक पद्धतीने मसाज करणे, वाफ देणे (स्टीम), तसेच बस्ती देणे अशा पंचकर्म प्रक्रियांची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. विशेष म्हणजे, सर्व प्रक्रियांचे प्रशिक्षण संस्थेकडून देण्यात येणार असल्याने अनुभव नसलेल्या उमेदवारांनाही संधी उपलब्ध आहे.50000उमेदवारांनी किमान १ वर्ष काम करण्याची तयारी असणे आवश्यक असून निवड झाल्यानंतर १२ महिन्यांचा करार केला जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी थेट संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अर्ज व अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक : 9028474737, 7276519111
ही भरती प्रक्रिया बार्शीतील स्थानिक युवकांसाठी रोजगाराची चांगली संधी मानली जात आहे.
5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button