मा. आ. राजेंद्र राऊत यांच्या प्रयत्नाने, भगवंत महोत्सव 2026 साठी बाजार समितीकडून 10 लाखांचा निधी मंजूर

0

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री भगवंत यांच्या प्रकटदिनानिमित्त दरवर्षी साजरा होणाऱ्या भगवंत महोत्सव 2026 साठी बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या पाठपुराव्यामुळे या निधीला मंजुरी मिळाल्याची माहिती समोर आली आहे.

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था सोलापूर यांच्या कार्यालयाकडून मिळालेल्या परवानगीनुसार, बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीने श्री भगवंत प्रकटदिनानिमित्त आयोजित होणाऱ्या भगवंत महोत्सवामध्ये विविध उपक्रम राबविण्यासाठी हा निधी खर्च करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या संदर्भातील प्रस्ताव बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मांडून हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता.5000बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये धाराशिव, बीड, लातूर, अहमदनगर आणि सोलापूर या जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणात शेतीमाल येतो. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात बाजार समितीचे उत्पन्न सुमारे १२.५५ कोटी रुपये असून ते मागील वर्षाच्या तुलनेत वाढलेले आहे. बाजार समितीकडे सुमारे २४.७० कोटी रुपयांच्या ठेवी असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली आहे.

दरवर्षी बार्शी नगरपरिषद व भगवंत देवस्थानच्या वतीने भगवंत प्रकटदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या महोत्सवात धार्मिक कार्यक्रमांसह सांस्कृतिक उपक्रम, भजन, गायन, कीर्तन, शेतकरी जनजागृती उपक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमांच्या आयोजनासाठी आणि बाजार समितीच्या कार्याचा प्रचार-प्रसार करण्यासाठी १० लाख रुपये खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ अंतर्गत असलेल्या तरतुदीनुसार हा निधी खर्च करण्यास जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था सोलापूर यांनी अटी व शर्तींसह अंतिम मंजुरी दिली आहे. माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या पुढाकारामुळे बार्शीच्या ग्रामदैवताच्या महोत्सवासाठी मिळालेला हा निधी महोत्सव अधिक भव्य व आकर्षक करण्यास मोठी मदत ठरणार असल्याची भावना भाविक व नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.50000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या