महाराष्ट्रयोजनासोलापूर

विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांनी UDID व आधार कार्ड ३१ मार्च पूर्वी संलग्न करावे

दिव्यांग लाभार्थ्यांना मासिक अर्थसहाय्य रु.१५०० वरून रु.२५०० इतके वाढविण्यात आलेले आहे.

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

सोलापूर, दि. 12 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णय दिनांक १५ सप्टेंबर २०२५ अन्वये विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणारे मासिक अर्थसहाय्य रु.१५०० वरून रु.२५०० इतके वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. त्यानुसार संबंधित दिव्यांग लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे थेट लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात करण्यात येत आहे.

याअनुषंगाने राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना, वृद्ध व्यक्तीसाठी श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी दिव्यांग निवृत्तीवेतन योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांचे UDID कार्ड व आधार कार्ड दिनांक ३१ मार्च २०२६ पूर्वी संलग्न करणे बाबत सूचना प्राप्त झालेल्या आहेत.तरी सर्व संबंधित दिव्यांग लाभार्थ्यांनी शासनाच्या सूचनेनुसार आवश्यक कागदपत्रांसह दिनांक ३१ मार्च २०२६ पूर्वी कार्यालयाशी संपर्क साधून प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन संजय गांधी निराधार योजना शहर कार्यालयच्या तहसिलदार शिल्पा पाटील यांनी केले आहे.5000तसेच संजय गांधी शहर शाखा कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील विशेष सहाय्य योजनेतील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी दिनांक ३१ मार्च २०२६ पूर्वी आपले वैश्विक ओळखपत्र (UDID Card) व आधार कार्ड संलग्न करणे आवश्यक आहे. यासाठी लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह संजय गांधी शहर शाखा कार्यालयाशी संपर्क साधावा.लाभार्थ्यांनी वैश्विक ओळखपत्र (UDID Card), आधार कार्ड, बँक पासबुक, अपंग प्रमाणपत्र, आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांक कागदपत्रे बरोबर आणणे आवश्यक आहे. सदर कागदपत्रांसह संजय गांधी शहर शाखा कार्यालय, जुने जिल्हाधिकारी कार्यालय आवार, सोलापूर येथे संपर्क साधल्यास दिव्यांग लाभार्थ्यांचे UDID व आधार कार्ड संलग्न करण्याची कार्यवाही करण्यात येईल.50000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button