अल्पवयीनमुलीवर अनैसर्गिक अत्याचार केल्या प्रकरणी सेशन कोर्टाने आरोपीस सुनावली २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

0

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

बार्शी : दि १२/२/२०२६ रोजी बार्शी येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायाधिश व्हि. के मांडे साहेब यांनी माढा तालुक्यातील आरोपी गणेश मारूती पवार यास अल्पवयीन मुलीवर अनैसर्गिक अत्याचार केल्या प्रकरणी दोषी ठरवून २० वर्ष सश्रम कारावास व २४ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.

माढा तालुक्यातील आरोपी गणेश मारूती पवार याने दि.२८/०२/२०२४ रोजी दुपारी २/३० वा अल्पवयीन निर्भया वय ७ वर्ष ही टी. व्ही पाहण्यासाठी आरोपीचे घरी गेली होती. त्यावेळेस घरी कोणी नाही याचा फायदा घेवून आरोपीने गोड बोलून टी. व्ही रूममधून उचलून घेवून स्वयपाक रूममध्ये छ ोवून गेला. किचन कट्यावर बसवून आरोपीने निर्भया हिचेवर अनैसर्गिक अत्याचार केला व याबाबत घरी कोणास सांगीतले तर जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर निर्भया घरी गेल्यानंतर घाबरलेली होती. तिच्या आई-वडीलांनी तिला का घाबरली बाबत विचारणा केली असता तिचे सोबत घटलेले अमानवी कृत्य सांगीतले.

त्यानंतर पिडीतेचे आईने माढा पोलीस ठाणे येथे दि २८/०२/२०२४ रोजी आरोपीविरूध् द भा.द.वि. कलम ३७७,५०६ व बाल लैंगिक अत्याचार कायदा २०१२ कलम ४,६,८,१२ अन्वये गुन्हा दाखल केला. सहा. पोलीस निरीक्षक नेताजी बंडगर व दप्तरी पो.हे. कॉ संदिप निचळ यांनी आरोपीस अटक करून सबळ पुरावा गोळा करून आरोपीविरूध्द दोषारोपपत्र दाखल केले.

सरकार पक्षाच्या वतीने सदर गुन्हा शाबितीसाठी ७ साक्षीदार तपासण्यात आले व आरोपीच्या वकिलांनी बचावासाठी १ साक्षीदार तपासण्यात आला. यातील फिर्यादी व पिडीतीची तसेच फिर्यादीचे साक्षीस अनुसरुन वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष तसेच तपास अधिकारी सपोनि नेताजी बंडगर यांनी तपासा दरम्यान गोळा केलेले पुरावे व पिडीते बरोबर झालेल्या अत्याचाराच्या अनुषंघाने मे. कोर्टासमोर आलेला पुरावा या सर्व बाबी सरकारी वकिल दिनेश देशमुख यांनी मे. कोर्टासमोर मांडल्या.

सरकार पक्षाचे वतीने युक्तीवाद करण्यात आला की, आरोपीने अल्पवयीन मुलीवर अमानुष अनैसर्गिक कृत्य केलेले आहे, तसेच फिर्यादी व इतर साक्षीदार यांची आरोपी सोबत कोणत्याही प्रकारे पूर्व वैमनस्य नसल्याने खोट्या गुन्हयात आरोपीस गुंतवले नाही. सदर बाब सरकार पक्षाचे युक्तीवादामध्ये निदर्शनास आणुन देण्यात आली व सरकार पक्षाच्या युक्तीवादाला सहायक म्हणुन मा.ना.सर्वोच्च न्यायालय यांचे दाखले देण्यात आले.

सरकारी पक्षाचा युक्तीवाद व आरोपीविरुध्द आलेला पुरावा याचा विचार करता विशेष जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री व्हि. के मांडे साहेब यांनी आरोपी यास भादविक ३७७ अन्वये दोषी धरुन १० वर्षे सक्त मजुरी व ५,०००/- रू दंड व दंड न भरल्यास २ महिने सक्त मजूरी, बाल लैंगिक अत्याचार कायदा २०१२ कलम ४ अन्वये १० वर्षे सक्त मजुरी व ५०००/- रु दंड व दंड न भरल्यास २ महिने सक्त मजूरी, बाल लैंगिक अत्याचार कायदा २०१२ कलम ६ अन्वये २० वर्षे सक्त मजुरी व १००००/- रु दंड व दंड न भरल्यास ४ महिने सक्त मजूरी, बाल लैंगिक अत्याचार कायदा २०१२ कलम ८ अन्वये ३ वर्षे सक्त मजुरी व २०००/- रु दंड व दंड न भरल्यास १ महिने सक्त मजूरी, बाल लैंगिक अत्याचार कायदा २०१२ कलम १२ अन्वये ३ वर्षे सक्त मजुरी व २०००/- रु दंड व दंड न भरल्यास १ महिने सक्त मजूरी अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच दंडाची पूर्ण २४००० रू रक्कम निर्भया हीस नुकसान भरपाई पोटी देणेबाबत न्यायालयाने आदेश केले. सर्व शिक्षा एकत्र भोगण्याचे आदेश सुनावण्यात आले. सरकार पक्षा तर्फे सरकारी वकिल दिनेश देशमुख यांनी काम पाहीले. तसेच कोर्ट पैरवी म्हणून पोलीस हवालदार अमृत खेडकर व महिला पोलीस अमलदार रीना शेख यांनी साक्षीदारांना योग्य मार्गदर्शन करून वेळोवेळी कोर्टात हजर ठेवले आहे.

सदर केसमध्ये अशोक सायकर उपविभागीय पोलीस अधिकारी बार्शी व नेताजी बंडगर सहा पोलीस निरीक्षक यांनी फिर्यादी व साक्षीदार यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले.50000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या