निधीबार्शीसोलापूर

बार्शीचे प्रांत अधिकारी सदाशिव पडदुणे यांच्या पाठपुराव्यामुळे अंगणवाडी केंद्राला एस आर फंडातून ३० लाखांच्या निधीचे वितरण

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : पानगाव येथे प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांच्या पाठपुराव्यामुळे Indian Oil या कंपनीकडून महिला व बाल कल्याण विभागासाठी CSR फंडामधून ३० लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला.

यात एक नवीन अंगणवाडी रक्कम १२ लाख बांधून मिळाली. तसेच १८ लाख निधीतून १२ अंगणवाडी केंद्रांना किचन साहित्य, सोलर संच, LED tv set, पिण्याच्या पाण्यासाठी आरओ, मुलांना पौष्टिक आहार, बसकर, टेबल, रंगरंगोटी व इतर आवश्यक साहित्य देण्यात आले. या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांनी “बेटी बचाओ, बेटी पढाओ” प्रतिज्ञा घेऊन दोन मुलींच्या नावे प्रांगणामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.

या प्रसंगी प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे,बार्शी तहसीलदार एफ.आर.शेख,पंचायत समिती बार्शीच्या महिला बालकल्याण विभागाच्या प्रकल्प अधिकारी रेश्मा पठाण, indion oil चे अधिकारी,विस्तार अधिकारी,पर्यवेक्षिका, सेविका,लाभार्थी महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button