बार्शीमहाराष्ट्र

जि. प. शाळा बावी (आ ) येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : जि. प. शाळा बावी (आ ) ता. बार्शी येथे दिनांक 23 जानेवारी रोजी वार्षिक स्नेहसंमेलन व विद्यार्थी विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे, गटशिक्षणाधिकारी बालाजी नाटके, माजी जि. प. सदस्य समाधान डोईफोडे, सरपंच सोनाली करडे, शाळा व्य. समिती अध्यक्ष गव्हाणे, प्राचार्य प्रभाकर गव्हाणे,शाळा सुधार समिती सदस्य राहुल आगलावे उपस्थित होते.

सुरुवातीला प्रास्ताविक पर भाषणात मुख्या. सुनिल मगर यांनी शाळेच्या प्रगतीचा आलेख गावाकऱ्यांसमोर मांडला. यावेळी शाळेतील सर्व इयत्तेच्या विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचा अविष्कार केला. पाटलांचा बैलगाडा, गुलाबी साडी, बम बम बोले, शिवकन्या, लुंगी डान्स, टुकूर टुकूर अशा विविध गाण्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.API ढेरे साहेब यांच्या हस्ते क्रीडा स्पर्धा, विविध गुणदर्शन स्पर्धा, राज्यस्तरीय निबंध स्पर्धा मधील गुणवंत विदयार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

गटशिक्षणाधिकारी बालाजी नाटके साहेब यांनी शाळेचा गुणवत्तेचा चढता आलेख पाहून कौतुक केले. शाळा सुधार समितीच्या माध्यमातून शाळा भौतिक दृष्टया सुधारत आहे याबद्दल गावकऱ्यांना विशेष धन्यवाद दिले. चार तास चाललेल्या कार्यक्रमाला प्रेक्षकांची लक्षनीय उपस्थिती होती.गावकऱ्यांनी मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी बक्षीसांचा वर्षाव केला. कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन कांचन भांगे यांनी तर आभार प्रविण देशमुख यांनी मानले.कार्यक्रमासाठी शकुंतला पालके, सुधाकर पाटील,अश्विनी करडे ,पल्लवी पाटील, धनश्री आगलावे यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button